
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये राखी सावंत आल्यापासून रोज नवनवीन ड्रामा पाहायला मिळतो. राखी सावंतची एन्ट्री झाल्यानंतर अनेकांची हा शो पाहण्याची उत्सुकता वाढली होती पण आता घरात असं काही घडलं आहे की प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. बिग बॉसचा नवीन प्रोमो पाहून. नेटकऱ्यांनी संमिक्ष प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कलर्स मराठीने बिग बॉस मराठीचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की घरात राकेश बापट आणि तन्वी कोलते डान्स करताना दिसत आहेत. या रोमॅंटिक डान्स दरम्यान राकेश तन्वीला गालावर किस करताना दिसतो. त्यानंतर राखी तन्वीला विचारते हा कोणता डान्स आहे? त्यावर तन्वी राकेशला विचार असं सांगते.. तन्वी आणि राकेशचा डान्स सुरू असताना राखी डोळे बंद करते. येवढच नाही तर डान्स संपल्यानंतर राकेश पुन्हा एकदा तन्वीला किस करतो आणि राकेश हसतो, त्यानंतर राखी संतापते आणि तू परिणाम बघ असं म्हणते. त्यानंतर घरात एक वेगळीच धक्कादायक गोष्ट घडते
राखी सावंत हातात कात्री घेते आणि रागारागात स्वत:चे केस कापते. घरातील सदस्य यावेळी तिथे येतात. राखी तू हे काय करते आहे, असं प्रश्न राकेश राखीला विचारतो. त्यावर राखी म्हणते, ” राकेश, मी स्वत: ला शिक्षा देत आहे. मला कोणी हर्ट करू शकत नाही, फक्त मी स्वत:ला हर्ट करू शकेत. असं म्हणत राखी रडू लागते.
“The Kapil Sharma Show मध्ये कायमच लंगर असतो, अर्धा पंजाब…”, कॉमेडियन सुनील पाल यांची खोचक टिप्पणी
यावेळी दिपाली आणि तन्वी राखीला सांभाळतात. तर दुसरीकडे राकेशला राखीच्या या कृतीचा धक्का बसतो. तो अवाक् होऊन तिच्याकडे बघत उभा असतो. ‘राखीने टक्कल केलं असतं तर खूप चांगलं झालं असतं..नकली केस कापून काही उपयोग नाही,’ ‘तन्वीच्या घरचे हे सगळं बघून जीव देतील,’ ‘फक्त मनोरंजनासाठी राखी असं करू शकत नाही,’ ‘आता वाटतंय बिग बॉस बंद व्हावं,’ ‘राखी आता अती करतेय,’ ‘तन्वी राकेशची बहीण आहे हे लक्षात ठेवा सर्वांनी,’ ‘बहीण भाऊ म्हणत म्हणत असे वागतात.. बिग बॉससाठी काय काय करतील अशा अनेक समिश्र प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
The Kerala Story 2 आज होणार नाही प्रदर्शित? अॅडव्हान्स बुकिंगनंतर कोर्टाचा १५ दिवसांचा स्थगिती आदेश