Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फायटरमधील हृतिक-दीपिकाच्या किसींग सिनवरुन नवं वादळ, हवाई दलाच्या अधिकाऱ्यानं घेतला आक्षेप; पाठवली कायदेशीर नोटीस!

चित्रपटातील एका दृष्यात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणने हवाई दलाच्या युनिफॉर्ममध्ये एकमेकांना किस करताना दिसत आहेत. हृतिक-दीपिकाच्या किसिंगच्या या दृष्यावर आक्षेप घेत भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्याने या दृष्यावर आक्षेप घेत स्टारकास्ट आणि दिग्दर्शकाला नोटीस बजावली आहे. 

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 07, 2024 | 11:59 AM
Fighter (10)

Fighter (10)

Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता हृतिक रोशन ( kissing scene) आणि अभिनेत्री दिपीका पादुकोनची (Dipika Padukon) मुख्य भूमिका असलेला फायटर चित्रपट चांगलाच गाजतोय. चित्रपट तिकीट खिडकीवर प्रेक्षकांना खेचून आणण्यात यशस्वी झाला असून चित्रपटानं आतापर्यंत 181 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट रिलीज होऊ 13 दिवस उलटले आहेत अजुनही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी क्रेझ आहे. पण चित्रपटाबद्दल काहीशी चिंताजनक बातमी (Fighter Controversy) समोर आली आहे. चित्रपटातील एका दृष्यावर हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी कायदेशीर चित्रपटाची स्टारकास्ट आणि दिग्दर्शकाला नोटीस बजावली आहे.

[read_also content=”भारतीय पर्यटक व्हिसाशिवाय इराणला जाऊ शकतील, फक्त ‘या’ 4 अटी पूर्ण कराव्या लागतील! https://www.navarashtra.com/world/iran-announces-visa-free-entry-for-indian-tourists-entering-by-air-nrps-505134.html”]

कशावरुन होतोय वाद

फायटर चित्रपटात हृतिक रोशन आणि अभिनेत्री दिपीका पादुकोन यांना हवाई दलाच्या लढाऊ वैमानिकांच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे. चित्रपटात अनेक हवाई दृष्यांनी वाहवा मिळवली आहे. यासाठी दिग्दर्शकाचं चांगलच कौतुक होत आहे. असं असतानाही मात्र, चित्रपटातील एका दृष्यावर हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने आक्षेप घेतला आहे.

चित्रपटातील एका दृष्यात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणने हवाई दलाच्या युनिफॉर्ममध्ये एकमेकांना किस करताना दिसत आहेत. हृतिक-दीपिकाच्या किसिंगच्या या दृष्यावर आक्षेप घेत आसाममध्ये पोस्टिंग असलेल्या भारतीय हवाई दलातील विंग कमांडरचे सौम्यदीप दास यांनी या दृष्यावर आक्षेप घेत स्टारकास्ट आणि दिग्दर्शकाला नोटीस बजावली आहे.

काय म्हणाले विंग कमाडंर

विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी म्हटले की, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा किसिंग सीन म्हणजे हवाई दलाच्या गणवेशाचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले. हवाई दलाचा गणवेश हा केवळ कापडाचा तुकडा नसून आपल्या देशाच्या संरक्षणासाठी त्याग, शिस्त आणि अखंड समर्पणाचे प्रतीक आहे. दृश्यात, कलाकार भारतीय हवाई दलाचे सदस्य म्हणून दिसू शकतात. त्याने गणवेशात असे करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
दास यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले की, चित्रपटात रोमँटिक अँगल दाखवण्यासाठी या पवित्र गणवेशाचा वापर करणे चुकीचे आहे. आपल्या देशाच्या सेवेत असंख्य सैनिकांनी केलेल्या बलिदानाच्या प्रतिष्ठेचे हे अवमूल्यन करते. हे गणवेशातील वाईट वर्तन देखील सामान्य करते, जे आमच्या सीमांचे रक्षण करणाऱ्यांना सोपवलेल्या जबाबदारीच्या विरूद्ध धोकादायक उदाहरण दर्शवत असल्याचा दावाही या नोटीसमध्ये केला आहे.
नोटीसमध्ये पुढे म्हटले की, हवाई दलाच्या गणवेशात सार्वजनिक ठिकाणी रोमँटिक होणे हे  नियमांचे उल्लंघनच असून हवाई दलाच्या प्रतिबद्धतेबद्दल चुकीची प्रतिमा दर्शवते. हवाई दलाच्या जवानांकडून आपले कर्तव्य आणि कामाच्याबाबत बेजबाबदारपणा दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

जाहीर माफीची मागची

हा सीन हटवण्याची मागणी विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी ‘फायटर’च्या निर्मात्यांना केली आहे. निर्मात्यांनी जगासमोर हवाई दल आणि त्यांच्या सैनिकांची माफी मागावी, असेही ते म्हणाले. चित्रपट निर्मात्यांनी भविष्यात हवाई दलाच्या सैनिकांचा आणि गणवेशाचा अशा प्रकारे अनादर करणार नाही, अशी लेखी हमी द्यावी अशी मागणी दास यांनी केली.

Web Title: Air force office send legal notice to fighter movie team over hrithik roshan deepika padukone kissing scene nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2024 | 11:58 AM

Topics:  

  • deepika padukon
  • entertainment
  • hritik roshan
  • kissing scene

संबंधित बातम्या

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ
1

करण कुंद्रा ४ वर्षांपासून तेजस्वीच्या प्रेमात… तरीही नवीन प्रेयसीच्या शोधात? डेटिंग ॲपवरील प्रोफाइलने उडाली खळबळ

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री
2

काय ‘तारक मेहता…’ मधील कोमल भाभीने सोडला शो? मालिकेत नवीन पाहुण्यांची होणार एन्ट्री

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा
3

‘ठरलं तर मग’मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? नव्या पात्राबद्दल सुचित्रा बांदेकरचा मोठा खुलासा

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ
4

कोण आहे Utsav Dahiya? ज्याचा अपूर्व मुखिजावर फसवणुकीचा आरोप; व्हायरल व्हिडीओने उडाली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.