बिग बॉस मराठीच्या विजेत्याला लागली हळद, अभिनेत्याच्या मित्रांनी केली धमाल; Video Viral
सध्या सर्वत्र लगीनघाई सुरु आहे. सामान्य माणसांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत सर्वत्र लगीनघाई सुरु आहे. या दरम्यान, बिग बॉस मराठी ४ चा विजेता अक्षय केळकरच्या घरीही त्याच्या लग्नाची घाई पाहायला मिळत आहे. नुकतंच अक्षयला हळद लागली. त्याच्या हळदी दरम्यानचे अनेक फोटोज् आणि व्हिडिओज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या मित्रमंडळींनी हळदीमध्ये चांगलाच धुडगूस घातलेला पाहायला मिळायला. अभिनेत्याने स्वत: त्याच्या हळदीतले अनेक फोटो आणि व्हिडिओज् शेअर केले आहेत. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्याला अक्षरश: हळदीने माखून टाकलेलं दिसत आहे.
बिग बॉस मराठी ४ चा विजेता अक्षय केळकर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अक्षय त्याच्या लग्नाचे अपडेट्स तो आपल्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करताना दिसत आहे. त्याच्या लग्नापूर्वीच्या तयारीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत होता. गायिका साधना काकटकरसोबत अक्षय केळकर लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून साधना आणि अक्षय रिलेशनशिपमध्ये होते. त्यांची आधी फ्रेंडशिप होती, फ्रेंडशिपचं रुपांतर रिलेशनशिपमध्ये झालं. आता त्यांच्या प्रेमाचं रूपांतर लग्नात होणार आहे. त्यांच्या हळदी दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयसीयूमधून अखेर बाहेर आला Pawandeep Rajan, वेदनेतही आनंदी हसताना दिसला गायक!
अक्षयच्या हळदीतील व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये घरातील कुटुंबिय आणि नातेवाईक शिवाय अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत अक्षयचा हळदी कार्यक्रम पार पडला. अक्षयच्या हळदीला समृद्धी केळकर आणि प्रथमेश परब या त्याच्या सेलिब्रिटी मित्रांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. प्रथमेश आणि समृद्धी हे दोघेही अक्षयचे फार चांगले फ्रेंड्स आहेत. दरम्यान, ८ मेला अक्षय- साधनाचा मेहंदी सोहळा पार पडला. त्यापाठोपाठ ९ मेला अभिनेत्याचा हळदी समारंभ थाटामाटात संपन्न झाला. अक्षय- साधना या दोघांच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
अक्षय- साधनाच्या मित्रांनी लग्नासाठी खास ‘#रमाक्षय’ हा खास हॅशटॅगही तयार केलाय. अक्षय- साधनाच्या मेहंदीचीही बरीच चर्चा रंगली. अक्षयने त्याच्या होणाऱ्या बायकोच्या तिच्या मेहंदीमध्ये एका हातावर विठोबा आणि दुसऱ्या हातावर रुक्मिणीचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे या मेहंदीने लक्ष वेधलं. तर अक्षयने #रमाक्षय असं त्याच्या मेहंदीने हातावर लिहिलं. डिसेंबर २०२४ मध्ये अक्षय केळकरने त्याची गर्लफ्रेंड साधना काकटकरची ओळख सोशल मीडियावर करून दिली होती. जवळपास १० वर्षांपासून दोघंही रिलेशनशिपमध्ये आहेत. साधना ही गायिका असून अनेक लोकप्रिय मराठी अल्बम साँग्स गायले आहेत.