समिक्षकांसह प्रेक्षकांच्या पंसतीस उतरलेल्या 12वी फेल चित्रपटाची सध्या सगळीच आहे. फॅन्ससह सेलेब्रिटिही चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहे. नुकतचं अभिनेता हृतिक रोशननं ’12th फेल’ (12th Fail) चित्रपट पाहल्यानंतर चित्रपटाचं कौतुक केलं. हा चित्रपट मास्टरक्लास असल्याचं तो म्हणाला आहे. तर, आता हृतिक नंतर अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) सुद्धा चित्रपटाचं कौतुक केलं आहे. आलियानं इन्स्टावर स्टोरी पोस्ट करत चित्रपट आणि अभिनेता विक्रांत मेसीच्या अभिनयाचं कौतुक केलं.
[read_also content=”’12वी फेल’ नंतर आता ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटात झळकणार विक्रांत मेसी, गोध्रा हत्याकांडावर आधारित सिनेमा लवकच प्रेक्षकांच्या भेटीस! https://www.navarashtra.com/movies/aftger-12th-fail-now-sabarmati-report-become-vikrant-messy-next-film-nrps-498481.html”]
’12th फेल’चं पोस्टर तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करताना आलिया भट्टनं लिहिलं की, ’12th फेल’ हा आतापर्यंतचा सर्वात सुंदर चित्रपट आहे. या चित्रपटातील प्रत्येकाचा अभिनय खूपच चमकदार आहे. विक्रांत, तू इतका छान दिसत होतास की तुला पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. मेधा शंकरनं मनापासून काम केलंय. या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट तुमच्या हृदयाला भिडते. ते खूप हृदयस्पर्शी आहे.
आलिया भट्टपूर्वी हृतिक रोशननेही ’12thफेल’चं कौतुक केलं होतं. हृतिक म्हणाला होता, ‘शेवटी मी ’12th फेल’ देखील पाहिला आहे जो एक मास्टरक्लास चित्रपट आहे. चित्रपटाचं संगीतही लाजवाब आहे. विधू जी, तुम्ही काय चित्रपट बनवला आहे. असा चित्रपट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यातून मी खूप प्रेरित आहे.
Finally saw 12th Fail. It’s quite a masterclass in film making. Above everything else I was inspired by the use of sound and sound effects play in enhancing the moments. Brilliant performances. Mr. Chopra , what a movie ! Thank you for the brilliance. I am deeply inspired by this…
— Hrithik Roshan (@iHrithik) January 14, 2024
समिक्षकांसह प्रेक्षकांच्या पंसतीस उतरलेल्या या चित्रपटात अभिनेता विक्रांत मेसीनं (Vikrant Massey) प्रमुख भूमिका साकारली आहे तर मेधा शंकर,अनंत जोशी, अशुंमन पुष्कर यांच्याही महत्त्वाच्या भुमीका आहेत. . आयपीएस ऑफिसर मनोज कुमार शर्माच्या बायोपिक आधारित या चित्रपट विक्रांत मेसीच्या फिल्मी करिअरमध्ये मैलाचा दगड ठरला आहे. विधु विनोद चोप्रा यांनी ’12th फेल’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ’12th फेल’ हा भावनिक सिनेमा आहे ज्यामध्ये गरीब कुंटुंबात जन्मलेल्या मुलाची नोकरी आयपीएस ऑफिसर बनण्याचा प्रवास दाखवला आहे.