Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘घर बंदूक बिरयानी’ ‘या’ तारखेला होणार रिलीज, नागराज मंजुळेंच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे ‘घर बंदूक बिरयानी’च्या (Ghar Banduk Biryani)माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

  • By साधना
Updated On: Jan 12, 2023 | 04:52 PM
ghar banduk biryani

ghar banduk biryani

Follow Us
Close
Follow Us:

झी स्टुडिओज (Zee Studios) आणि नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule) निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani) या चित्रपटाचा भन्नाट टिझर काही महिन्यांपूर्वी झळकला होता. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक, पळापळी यात दिसत होती. त्यामुळे नेमके या चित्रपटात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता लागून राहिली होती. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून येत्या ३० मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकाच वेळी हा चित्रपट मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे (Sayaji Shinde), नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर (Akash Thosar) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ असे दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटात नेहमीच वैविध्यपूर्ण आणि अनन्यसाधारण विषय हाताळले जातात. त्यांची हीच खासियत घेऊन झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे ‘घर बंदूक बिरयानी’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

[read_also content=”‘वेड लावलंय’ गाण्याची क्रेझ पोहोचली सातासमुद्रापार, किली पॉलचा व्हिडिओ पाहून रितेश देशमुख म्हणाला… https://www.navarashtra.com/viral/kili-paul-dance-on-ved-lavlay-song-video-shared-on-instagram-nrsr-361204/”]

या चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, “झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अनोखा असतो. या वेळी पुन्हा आम्ही एक नाविन्यपूर्ण विषय घेऊन आलो आहोत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेकांना या चित्रपटाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. त्याबाबत विचारणाही होत होती. आता लवकरच या सगळ्याची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत.”.

Web Title: Announcement of ghar banduk biryani release date nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2023 | 04:40 PM

Topics:  

  • entertainment
  • Nagraj Manjule

संबंधित बातम्या

Shekhar Tonight : १४ वर्षांनंतर शेखर सुमन पुन्हा सज्ज; ‘शेखर टुनाइट’मधून रंगणार अनफिल्टर्ड संवाद
1

Shekhar Tonight : १४ वर्षांनंतर शेखर सुमन पुन्हा सज्ज; ‘शेखर टुनाइट’मधून रंगणार अनफिल्टर्ड संवाद

Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!
2

Abhang Tukaram : टाळ-मृदंगाच्या गजरात आता OTTवर तुकोबांची गाथा, ‘अभंग तुकाराम’चा दमदार ट्रेलर रिलीज!

Detective Dhananjay : थरार, कुतूहल आणि शिस्तबद्ध शूटिंग; मराठी OTT मालिकेबद्दल दिग्दर्शकाचे खुलासे
3

Detective Dhananjay : थरार, कुतूहल आणि शिस्तबद्ध शूटिंग; मराठी OTT मालिकेबद्दल दिग्दर्शकाचे खुलासे

Cricket League : मराठी कलाकारांची ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ रंगणार; ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे अनावरण
4

Cricket League : मराठी कलाकारांची ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’ रंगणार; ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे अनावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.