Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे साकार होणार भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे आयोजित 'सोमनाथ स्वाभिमान पर्व' या विशेष अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमावेळी चित्रपट अभिनेत्री संस्कृती बालगुडे व कलाकार समूह यांचे विशेष अध्यात्मिक सादरीकरण होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 22, 2026 | 04:40 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त सोमवार, 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक.येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, अध्यात्म आणि सनातन परंपरेचे महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

रोमान्स, भावना आणि फ्रेश केमिस्ट्री, पहिल्यांदाच एकत्र झळकणार भूषण प्रधान आणि सायली पाटील; ‘स्वप्नसुंदरी’मुळे वाढली उत्सुकता

कलात्मक सादरीकरण

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ हा भारतीय सांस्कृतिक अस्मिता, अखंड श्रद्धा आणि अध्यात्मिक परंपरेचा गौरव करणारा उपक्रम आहे. या पर्वाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीतील विविध भावविश्व, भक्तीपरंपरा आणि आध्यात्मिक मूल्यांचे कलात्मक सादरीकरण करण्यात येणार आहे.

विविध पैलू रसिकांना अनुभवता येणार

या कार्यक्रमात चित्रपट अभिनेत्री संस्कृती बालगुडे व कलाकार समूह यांचे विशेष अध्यात्मिक सादरीकरण होणार असून, त्यांच्या अभिव्यक्तीतून भक्ती, संस्कृती आणि भारतीय परंपरेचे विविध पैलू रसिकांना अनुभवता येणार आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पवित्र परिसरात होणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम अध्यात्म आणि कलेचा सुंदर संगम ठरणार आहे. या माध्यमातून उपस्थितांना सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून; तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे, अभिजात कला, लोककला आणि थोर कलावंतांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

या कार्यक्रमास सर्व नागरिकांसाठी विनामूल्य प्रवेश आहे. कला रसिक, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

 अंशुला कपूरच्या प्री-वेडिंग सोहळ्यात कपूर बहिणींचा जलवा; जान्हवी-खुशी नव्हेतर ‘या’ अभिनेत्रीने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Web Title: Somnath swabhiman parva trimbakeshwar nashik sanskruti balgude performance see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Actress Sanskruti balgude
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.