(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या चर्चेत आहे, कारण ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेनंतर ती लवकरच ‘शुभविवाह’ या नव्या मालिकेत एसीपी अपूर्वा पुरोहित ही पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका तिच्यासाठी खास आहे, कारण ती पहिल्यांदाच पोलीस अधिकारी साकारते आहे. अपूर्वा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. ती नेहमी आपल्या चाहत्यांसाठी खास पोस्ट करत असते. आज तिने तिच्या भावाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दोन वर्षांपूर्वी भावाने जगाचा निरोप घेतला असला तरी त्याच्या आठवणी आजही तिच्या मनात ताज्या आहेत.
अपूर्वाने भावासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, “हॅप्पी बर्थडे, ओमी. तू या जगातून जाऊन दोन वर्ष झाली, पण एकही दिवस असा गेला नाही, जेव्हा मला तुझी आठवण आली नसेल. १९९४ पासून आम्ही कधीच तुझा वाढदिवस एकत्र साजरा करायला विसरलो नाही आणि आजही, जरी तू शरीराने इथे नसलास तरी, मी माझ्या हृदयात तुझा वाढदिवस साजरा करते. तुझ्या प्रत्येक आठवणीत मला तुझं हसू दिसतं, मनात तुझा आवाज ऐकू येतो, आणि प्रत्येक शांत क्षणी तुझं प्रेम जाणवतं. तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही, पण तुझी ऊर्जा आणि उब आजही माझ्या आजूबाजूला आहे, जे शब्दांत सांगता येणार नाही.”
थिएटर नाहीत म्हणून ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाचे नाट्यगृहात शो, सगळे शोज हाऊसफुल
समंथाशी डिव्होर्स, शोभिताशी लग्न… नागा चैतन्याने सांगितला दुसऱ्या पत्नीच्या पहिल्या भेटीचा किस्सा
अपूर्वाने पुढे म्हटले की, ” तू जिथे असशील तिथे शांत आणि सुखी असशील आणि त्याच खोडकर स्मितहास्याने हसत असशील, ज्याने नेहमी आमचं आयुष्य उजळलं. तू कायम माझा छोटा भाऊ, माझा अभिमान, आणि माझ्या आत्म्याचा तो भाग राहशील, जो वेळ कधीच हिरावून घेऊ शकत नाही. मला तुझी खूप आठवण येते… आणि मी तुझ्यावर अथांग प्रेम करते. अप्पू.”