(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतलं पॉवर कपल नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केले. तेव्हापासून हे कपल सतत “कपल गोल्स” सेट करताना दिसत आहे. समंथाशी घटस्फोटानंतर काही वर्षातच नागा चैतन्यनं शोभिताशी लग्न केलं. तेव्हा समंथाच्या चाहत्यांनी या दोघांवर प्रचंड टीका केली होती. मात्र नागा आणि शोभिताने त्याकडे दुर्लक्ष केलं.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नागा चैतन्यने सांगितलं की, शोभिता सोबत त्याची पहिली भेट कुठे आणि कशी झाली होती.
नुकतेच जगपति बाबू यांच्या झी ५ वरील टॉक शोमध्ये नागा चैतन्य आणि शोभिता दोघेही सहभागी झाले होते. या शोमध्ये नागा चैतन्यने त्यांच्या लव्हस्टोरीवर पहिल्यांदाच खुलेपणाने भाष्य केलं. नागा चैतन्यने सांगितसं की त्यांच्या प्रेमाची सुरूवात सर्वात आधी इन्स्टाग्रामवर झाली होती. २०१८ मध्ये नागार्जुनच्या घरी सर्वात आधी त्यांची भेट झाली होती. तेव्हा मात्र त्यावेळी फारसं बोलणं झालं नव्हतं. त्यांच्या नात्याला खरी सुरुवात झाली ती २०२२ मध्ये झाली. म्हणजेच नागा चैतन्य आणि समंथा यांच्यातील घटस्फोटाच्या एक वर्षानंतर त्यांचं नातं सुरू झालं. शोभिताने नागा चैतन्यला इन्स्टाग्रावर फॉलो केलं. मग त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. तेलुगू भाषेमुळे आणि कलाक्षेत्रातील साम्यामुळे नागा आणि शोभिता हळूहळू एकमेकांच्या अधिक जवळ आले. मुंबईत कॉफी डेट्स, फोनवरच्या गप्पा, आणि वैयक्तिक भेटींमधून नातं फुलू लागलं. अखेरीस, ऑगस्ट २०२४ मध्ये नागा चैतन्यने शोभिताला प्रपोज केलं.
‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा जेवणावरून वाद, नीलम आणि फरहानामध्ये झाले भांडण; अभिषेक- शाहबाज देखील भिडले
६० कोटी रुपयांच्या फसवणुक प्रकरणात शिल्पा शेट्टीचा नोंदवला जबाब, EOW ने अनेक तास केली चौकशी
नागा चैतन्यने पुढे सांगितलं,”आम्ही इन्स्टाग्रामवर जास्त कनेक्ट झालो. माझी जोडीदाराशी इन्स्टाग्रामवर ओळख होईल, असं मी कधीच विचार केलं नव्हतं. मला तिचं काम माहिती होतं. एक दिवस मी तिच्या क्लाउड किचनबद्दल पोस्ट केली होती, तेव्हा तिने एक इमोजी कमेंट केली. तिथून आमचं बोलणं सुरू झालं आणि आम्ही प्रत्यक्षात भेटलो.”