appi amchi collector
‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Amchi Collector) या झी मराठीवरील(Zee Marathi) नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच (Appi Amchi Collector Promo) प्रदर्शित झाला. या मालिकेत अपर्णा माने (अप्पी) या मध्यवर्ती भूमिकेतुन नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक (Shivani Naik) पदार्पण करणार आहे. शिवानीने याआधी अनेक एकांकिकांमधून काम केलं आहे.
ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे. अपर्णा माने म्हणजे अप्पी खेडेगावातली मुलगी आहे. तिच्या गावात शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही. पण तिचं ध्येय मोठं आहे. तिला येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अपर्णाची संघर्ष कथा या मालिकेमध्ये दाखवण्यात आली आहे.
नवी मालिका
‘अप्पी आमची कलेक्टर’
२२ ऑगस्टपासून, सोम – शनि । संध्या. ७ वा. आपल्या झी मराठीवर#AppiAmchiCollector #ZeeMarathi pic.twitter.com/RXoftiVlg7— Zee Marathi (@zeemarathi) July 31, 2022
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, “मी खूप भाग्यवान आहे की मला झी मराठीच्या मंचावर काम करण्याची संधी मिळतेय. एक नवीन जबरदस्त प्रेरणा असणारी मोठी संकल्पना उराशी बाळगून अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करणाऱ्या मुलीची भूमिका मला करायला मिळणार आहे. मी खूप खुश आहे. कारण मी एका ध्येयसमर्पित मुलीची भूमिका करणार आहे. ही अप्पी प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल.”
‘आप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका २२ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.