Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॅनच्या हास्यासाठी ‘इन्स्पेक्टर मंजू’चा प्रवास, “श्रियाला भेटून पाणावले डोळे” 

८४ वर्षांचे आजोबा सत्या- मंजूची गोष्ट खरी आहे असं समजून थेट सेटवर पोहोचले होते.त्यानंतर आता मंजूला भेटण्याचा हट्ट करणारी चाहती समोर आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 04, 2025 | 12:31 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मालिका म्हणजे प्रेक्षकांचं एक नवीन कुटुंब असतं. ‘सन मराठी’वरील ‘इन्स्पेक्टर मंजू’ या मालिकेला प्रेक्षकांकडून अफाट प्रतिसाद मिळत आहे. याआधी ८४ वर्षांचे आजोबा सत्या- मंजूची गोष्ट खरी आहे असं समजून थेट सेटवर पोहोचले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मालिकेची गोष्ट खरी आहे असं समजून सत्या- मंजूला भेटण्याचा हट्ट करणारी चाहती समोर आली आहे. मुंबईच्या जोगेश्वरीत राहणारी श्रिया नाईक ही सत्या-मंजूची मोठी चाहती आहे. श्रियाला डाउन सिंड्रोम हा आजार आहे. ती या मालिकेतील पात्रांना आपले खरे मित्र समजते. मालिकेत मंजूला गोळी लागल्यापासून श्रिया अस्वस्थ होत नेहमी साताऱ्याला जाण्याचा हट्ट आईबाबांकडे करत असते. तिला बरं वाटावं म्हणूनच मालिकेतील कलाकार सत्या आणि मंजूने थेट तिच्या घरी पोहोचून खास सरप्राईज दिलं. कलाकारांना समोर पाहताच श्रिया आनंदाने भारावून गेली. यावेळी सत्या-मंजूने तिला एक सुंदर फोटो फ्रेम गिफ्ट केली ज्यात त्यांचा आणि श्रियाचा फोटो आहे. हा क्षण श्रियासाठी अविस्मरणीय ठरला.

‘म्हणून व्हेंटिलेटर लिहायला मला ४८ वर्ष लागली’, वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजेश मापुस्करांचा खुलासा
श्रिया बद्दल सांगताना तिचे बाबा यशवंत नाईक म्हणाले की, “श्रिया सन मराठीवरील सर्व मालिका बघते. तिला सगळ्यात जास्त ‘इन्स्पेक्टर मंजू’ ही मालिका आवडते. जेव्हाही आम्ही तिला घरात ओरडतो तेव्हा ती आम्हाला म्हणते मी माझ्या सत्या- मंजूकडे जाईन. मालिकेत मंजूला गोळी लागण्याचा सीन पाहून श्रिया घाबरली. ती बेचैन होऊन मला साताराला जायचं आहे हा हट्ट तिने आमच्याकडे केला. २ वर्ष न चुकता श्रिया ही मालिका बघते. रात्री ८ वाजले की, ती घराबाहेर कधीच थांबत नाही. या मालिकेतील मंजूमुळे ती आणखीन खंबीर झाली आहे. आज तिचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे असं मी म्हणेन हा आनंद तिच्यासाठी गगनात न मावण्यासारखा आहे. तिचं हे हास्य पाहून आम्ही समाधानी आहोत.”

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

श्रियाच्या या प्रेमावर मंजू म्हणजेच अभिनेत्री मोनिका राठी म्हणाली की, ” मंजूला मिळणार हे प्रेम पाहून मी निशब्द आहे. सातारा ते मुंबई हा प्रवास पहिल्यांदा फार वेगळा होता. कारण आज मी आणि सत्या आमच्या एका फॅनला भेटण्यासाठी मुंबईला आलो आहोत. श्रिया आमच्या मालिकेतील प्रत्येक पात्रावर भरभरून प्रेम करते. प्रत्येक भाग तिने बारकाईने पहिला आहे. ती म्हणाली, “मम्मीसाहेबांना मी चांगलाच धडा शिकवेन.” हे वाक्य ऐकून मला धक्का बसला. कारण ती मालिकेत इतकी गुंतली आहे.  ती डाऊन सिंड्रोम या आजारात आहे आणि या सगळ्यात ती मंजूला तिची खास मैत्रीण मानते. हे सगळं ऐकून आणि आज प्रत्यक्षात तिला भेटून मी भरून पावले. श्रियाचा हा आनंद असाच रहावा हीच बाप्पाकडे माझी प्रार्थना आहे आणि ‘इन्स्पेक्टर मंजू’वर प्रेक्षकांचं हे प्रेम कायम रहावं.”

Web Title: Inspector manjus journey for fans laughter meeting shriya brought tears to my eyes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi serial news

संबंधित बातम्या

”मोठे भाग्य लाभले..”, प्रियंका चोप्राने ‘वाराणसी’ मध्ये दिग्गजांसोबत काम करण्याबद्दल व्यक्त केली उत्सुकता
1

”मोठे भाग्य लाभले..”, प्रियंका चोप्राने ‘वाराणसी’ मध्ये दिग्गजांसोबत काम करण्याबद्दल व्यक्त केली उत्सुकता

”गावरान सौंदर्य… मातीतलं सौंदर्य ”.. प्राजक्ता माळीचा पारंपरिक म्हाळसा लूक सोशल मीडियावर व्हायरल!
2

”गावरान सौंदर्य… मातीतलं सौंदर्य ”.. प्राजक्ता माळीचा पारंपरिक म्हाळसा लूक सोशल मीडियावर व्हायरल!

११ वर्षांनंतर रेखाचा कमबॅक? बॉलिवूडपासून दूर असूनही ३०० कोटींची संपत्तीची मालकीण!
3

११ वर्षांनंतर रेखाचा कमबॅक? बॉलिवूडपासून दूर असूनही ३०० कोटींची संपत्तीची मालकीण!

७.३ रेटिंगसह धमाकेदार एंट्री! जिओ हॉटस्टारवर येताच हा चित्रपट झाला हिट, क्लायमॅक्सने केले प्रेक्षकांना थक्क
4

७.३ रेटिंगसह धमाकेदार एंट्री! जिओ हॉटस्टारवर येताच हा चित्रपट झाला हिट, क्लायमॅक्सने केले प्रेक्षकांना थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.