आर्यमन सेठी आणि योगिता बहानी राहणार लिव्हइनमध्ये (फोटो सौजन्य - Instagram)
अर्चना पुरण सिंगच्या आनंदाला सीमा नाही राहिली आहे कारण तिचा मोठा मुलगा आर्यमन सेठीने गर्लफ्रेंड आणि ‘द केरळ स्टोरी’ फेम योगिता बिहानीशी साखरपुडा केला आहे. या प्रसंगी अर्चनाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आर्यमन सेठी आणि योगिता यांनी नुकतेच एका व्लॉगमध्ये त्यांच्या नात्याची पुष्टी केली होती आणि आता दोघेही लग्नाच्या तयारीत आहेत. अचानक सरप्राईज देत आर्यमनने योगिताला लग्नाची मागणी घातली असल्याचे त्याच्या ब्लॉगमधून दिसून येत आहे.
आता अर्चना पुरण सिंगचा मुलगा आर्यमन त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणार आहे. नवीनव्लॉगमध्ये, आर्यमन सेठीने पालक अर्चना पुरण सिंग आणि परमीत सेठी यांचे आशीर्वाद घेतले आणि नंतर योगिता बिहानीला प्रपोज केले. व्लॉगमध्ये, कुटुंबाने असेही सांगितले की आर्यमन आणि योगिता शेजारच्या घरात एकत्र राहतील. त्यांचे घर एका बागेद्वारे अर्चना-परमीतच्या घराशी जोडले जाईल.
नवीन घरात प्रवेश
नवीन घराची चावी देत केले प्रपोज
व्हिडिओची सुरुवात आर्यमन सेठी आणि योगिता बिहानी यांनी केलेल्या घोषणेने झाली. ते म्हणाले, ‘आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे, त्या घरात. आम्ही खूप उत्साहित आहोत. आम्ही एकत्र जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आम्ही मोठे झालो आहोत असे वाटते.’
घराची झलक
आर्यमन सेठी आणि योगिता यांनी ते घरही दाखवले ज्यामध्ये ते आता एकत्र राहणार आहेत. अर्चना पूरण सिंग आणि परमीत सेठीदेखील नवीन घर पाहण्यासाठी आले होते. घर पाहून योगिता म्हणते, ‘मला नेहमीच घरासमोर बाग असलेले घर हवे होते.’ हे ऐकून परमीत सेठी म्हणाले की, ‘बेटा, आणखी काहीतरी माग.’ मग योगिता म्हणाली, ‘मला जे हवे होते ते मला मिळत आहे. तुम्ही मला आधीच एक गोष्ट दिली आहेस.’ हे ऐकून परमीत सेठी गमतीने म्हणाला, ‘आम्ही म्हणालो होतो की आम्ही त्याला (मुलगा आर्यमनला) आता सांभाळू शकत नाही.’
फिल्मी प्रपोज
आर्यमन सेठीने घराच्या चाव्या आणि एक फुल घेऊन योगिता बिहानीला प्रपोज केले. तो गुडघ्यावर बसला आणि योगिताला फुलं दिले आणि घराच्या चाव्या देऊन प्रपोज करताना त्याने विचारले, ‘तू माझ्याशी लग्न करशील का?’ योगिता हो म्हणाली आणि मग दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर आर्यमन सेठीने योगिताच्या बोटात अंगठीऐवजी चावीची अंगठी (घराची चावी) घातली आणि म्हणाला की ही तुझी अंगठी आहे. आता हे तुझे घर आहे.’
अर्चना झाली भावूक
अर्चना पुरणसिंह झाली भावूक
हे ऐकून अर्चना पूरण सिंह भावुक झाल्या आणि म्हणाल्या की त्यांचा मुलगा अशा पद्धतीने चावी घेत कोणाला प्रपोज करेल असे तिने कधीच विचार केला नव्हता. व्लॉगच्या शेवटी, आर्यमनने सांगितले की पालक अर्चना पुरण सिंह आणि परमीत सेठी यांनी त्याला प्रपोजल प्लॅन करण्यास मदत केली. तसेच सांगितले की चावीच्या अंगठीची कल्पना त्यांची होती.
कोण आहे अर्चना पूरण सिंहची होणारी सून? मुलगा आर्यमन सेठीने स्वतः केलं नातं कन्फर्म
आर्यमन सेठी आणि योगिता बिहानी यांची लव्हस्टोरी
आर्यमन आणि योगिता राहणार एकत्र
आर्यमन सेठी आणि योगिता बिहानी यांच्या प्रेमकथेबद्दल बोलताना, दोघेही पहिल्यांदा आर्यमनच्या ‘छोटी बातें’ या म्युझिक व्हिडिओच्या सेटवर भेटले असे म्हणाले होते. त्यावेळी दोघांच्या मनात एकमेकांबद्दलच्या भावना जाग्या झाल्या मैत्री झाली आणि नंतर हळूहळू ते प्रेमात पडले. नंतर, दोघांनीही आर्यमन सेठीच्या Vlog मध्येच त्यांच्या नात्याची पुष्टी केली. अर्चना पूरण सिंग आणि परमीत सेठी यांनीही योगिताला भेटून त्यांच्या मुलाच्या नात्याला मान्यता दिली.
पहा व्लॉग