अर्जुन कपूरचं बहिणी जान्हवी आणि खुशीसोबत कसं आहे बॉन्डिंग ? स्वत: केला खुलासा
अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर या दोन्ही कुटुंबियांची कथा एका चित्रपटापेक्षा काही कमी नाही. दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन होण्यापूर्वी अर्जून त्याची बहिण अंशुला कपूरचे जान्हवी आणि खुशी कपूर यांच्याशी फारसे संबंध नव्हते. इतकंच काय तर या दोन कुटुंबांना कधीच एकत्र पाहण्यात देखील आलं नाही. मात्र श्रीदेवी यांच्या निधनानंतर या दोन्ही कुटुंबांनी कदाचित एकत्र यायचा निर्णय घेतला. अर्जुनला जान्हवी आणि खुशीबाबत विशेष प्रेम आहे, याबाबत त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे.
सलमान खानची बहीण अर्पिता खानने मुंबईत उघडले नवीन रेस्टॉरंट, चाहत्यांनी केले अभिनंदन!
अर्जुन कपूर सध्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये तो एका व्हिलनच्या भूमिकेत आहे. चित्रपटाने रिलीजच्या एका महिन्यात २४३ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपट रिलीज होऊन २८ दिवस झालेले आहेत. दरम्यान, त्याने आपल्या दोन्ही बहिणींसोबतच्या बॉन्डबद्दल भाष्य केले आहे. मुलाखतीत अभिनेत्याने आपल्या बहिणींसोबतचे नाते गेल्या काही वर्षांत कशापद्धतीने विकसित होत गेले, याबद्दल सांगितलेय. अभिनेत्याने सांगितले की, गेल्या काही वर्षांत आलेल्या वाईट परिस्थितींमुळे तो कायम आपल्या बहिणींसोबत आहे. अर्जुन- अंशुला आणि जान्हवी- खुशी नेहमीच एकमेकांसोबत असतात.
टाइम गॉड झाल्यानंतर ईशा सिंह आणि अविनाश मिश्रा यांच्या मैत्रीत तडा!
गॅलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन कपूरने सांगितले की, “जे काही घडलं, ते फार दुर्दैवी आहे. माझ्या कोणत्याही दुष्मनासोबत घडू नये, अशी प्रार्थना करतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगला क्षण जान्हवी आणि खुशीशिवाय अपूर्ण आहे.” अर्जुन कपूरने मुलाखतीदरम्यान सांगितले की, तो जान्हवी कपूरच्या फार जवळचा व्यक्ती आहे. कारण त्या दोघांच्या वयात फार कमी फरक आहे. तो म्हणाला की जान्हवी आणि खुशी दोघीही मला कायम कोणत्याही गोष्टीमध्ये प्रोत्साहित करत असतात. त्या नेहमीच कोणतीही गोष्ट समजून घेण्याचा फार प्रयत्न करतात. कारण त्यांच्याही कामाचा तो एक भाग असल्याने ते खूप समजण्याचा प्रयत्न करतात. त्या दोघीही कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असतात.”
साई पल्लवी आणि शिवकार्तिकेयनचा ब्लॉकबस्टर ‘अमरन’ चित्रपट ओटीटी रिलीज, जाणून घ्या कुठे कधी पाहू शकता!
मला माहित आहे की मी त्यांचा मोस्ट केअरिंग भाऊ आहे. मात्र, आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात, जेव्हा आपण कमजोर होऊन जाता. जान्हवीने मला ती कमजोरी दाखवली आहे. नकारात्मकतेबद्दल बोलताना अर्जुन कपूर म्हणाला, “आयुष्यात अशी केव्हातरी वेळ येते, तेव्हा आपणंच आपल्या आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. शिवाय निवडीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केला जातो. तुम्ही प्रश्न करता की हे सर्व फायदेशीर आहे का, तुम्हाला प्रश्न पडतो की आपल्या व्यवसायात इतकी नकारात्मकता आहे की काहीवेळा ती आपल्यावर येते. एक बिंदू जिथे आपण ते हाताळू शकता ते स्वतःचे पाऊल मागे आहे कोणाला काहीही न बोलता घे.”