(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. भाईजान त्याच्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना वैयक्तिक कारणांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. आता सलमानची बहीण अर्पिता खानबाबत एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अर्पिताच्या या गुड न्यूजनंतर आता तिचे चाहते तिचे अभिनंदन करत आहेत. अर्पिताने नुकतेच मुंबई मध्ये नवीन रेस्टॉरंट सुरु केले आहे. अर्पिता आता नव्या रेस्टॉरंटची मालकीण बनली आहे.
अर्पिता खानने दिली आनंदाची बातमी
सलमान खानची बहीण अर्पिता खानने आता मुंबईत तिचे नवीन रेस्टॉरंट उघडले आहे. गेल्या गुरुवारी अर्पिता तिच्या नवीन रेस्टॉरंटच्या लाँच इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी अर्पिता खानसोबत तिचा पती आयुष शर्माही उपस्थित दिसला. अर्पिताच्या या नवीन रेस्टॉरंटचे नाव ‘मर्सी इंडिया’ आहे. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात सलमान दिसला नाही पण अतुल अग्निहोत्री आणि अलविरा खान अग्निहोत्रीही त्यांची मुलगी अलिजेसह येथे पोहोचले होते.
अर्पिता खानचा नवा प्रवास सुरू
अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या रेस्टॉरंटच्या उद्घाटनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुरुवातीच्या दिवसाची काही खास झलक दाखवत, इंस्टाग्रामवरील प्रसिद्ध पेज व्हायरल भियानीने अर्पिताला टॅग केले आणि लिहिले, ‘मुंबईला आता एक नवीन हॉटस्पॉट ‘मर्सी इंडिया’ मिळाला आहे. अर्पिता खानने हॉस्पिटॅलिटीच्या जगात तिचा नवीन प्रवास सुरू केला आहे.’ असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. तसेच आता अर्पिताला तिच्या नव्या प्रवासासाठी चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीदेखील शुभेच्छा देत आहेत.
साई पल्लवी आणि शिवकार्तिकेयनचा ब्लॉकबस्टर ‘अमरन’ चित्रपट ओटीटी रिलीज, जाणून घ्या कुठे कधी पाहू शकता!
भाऊ सलमान रेस्टॉरंट लाँच इव्हेंटदरम्यान दिसला नाही
बॉलीवूड अभिनेता सलमान खान बहीण अर्पिता खानच्या मुंबईतील नवीन रेस्टॉरंटच्या लाँच इव्हेंटमध्ये उपस्थित दिसला नाही. सध्या अभिनेता त्याच्या आगामी चित्रपट ‘सिकंदर’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच अभिनेता सध्या त्याच्या वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत अभिनेता काम करताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तगडे स्टारकास्ट झळकणार असून, हा चित्रपट २०२५ यामध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे.