Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कला दिग्दर्शक नितीन बोरकर काळाच्या पडद्याआड! ब्रेन स्ट्रोकशी देत होते झुंज

मराठी सिनेसृष्टीतील नामांकित कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचे ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले आहे. नेरूळ येथील DY पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 18, 2026 | 07:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मराठी सिनेसृष्टीत नावाजलेला कला दिग्दर्शक नितीन बोरकर याचे निधन झाले आहे. त्याच्या निराधानाच्या बातमीने संपूर्ण मराठी सिनेसृष्टी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनाची बातमी येताच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांवर शोक व्यक्त केले आहे. नितीन हा गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता. अखेर त्याची ही झुंज अयशस्वी ठरली आहे आणि तो काळाच्या पडद्याआड झाला आहे.

‘अवतार 3’ OTT वर प्रदर्शित; कधी आणि कुठे पाहता येणार 11,200 कोटींचा चित्रपट? जाणून घ्या

रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी, नेरूळचा DY पाटील हॉस्पिटलमध्ये नितीन बोरकरवर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याने जीव सोडला. ब्रेन स्ट्रोकसारख्या जीवघेण्या आजाराने शेवटी नितीन बोरकरला कायमचं हरवलं. त्याच्या जाण्याने सिनेसृष्टीने एक उत्तम कलाकार आणि दिग्दर्शक गमावला आहे.

नितीन बोरकरने अनेक हिंदी तसेच मराठी सिनेमांसाठी काम केले आहे. त्याने सलमान खानचा गाजलेला सिनेमा ‘बॉडीगार्ड’ तसेच इतर सिनेमे ‘द माईटी हार्ट’, ‘आणि काय हवं?’ आणि ‘कदाचित’ सारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये कला दिग्दर्शकाची भूमिका निभावली आहे. प्रसिद्ध मराठी सिनेमा ‘दगडाबाईची चाळ’ तसेच ‘मी वसंतराव’ सारख्या सिनेमांसाठीही त्याने काम केले आहे. चाळीसहून अधिक सिनेमांमध्ये त्याचे योगदान आहे.

निक्की तांबोळीला नेमकं झालं तरी काय? अभिनेत्रीने शेअर केली हेल्थ अपडेट, फोटो व्हायरल

अगदी काही दिवसांपूर्वी नितीन याच्या @nitin_borkar01 या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये गूगल पेचा QR कोड शेअर करण्यात आला होता. या पोस्टखाली कॅप्शन नमूद देण्यात आले होते की, “आपला मित्र आर्ट डायरेक्टर नितीन गणपत बोरकर याला काल दिनांक 1 नोव्हेंबर रोजी पक्षाघात – ब्रेन स्ट्रोक चा अटॅक आला असून poona hospital मध्ये त्याचे उपचार चालू आहेत. त्याला पुढील उपचारासाठी आर्थिक सहकार्याची गरज आहे. त्याची प्रकृती सुधारावी, सर्वतोपरी उत्कृष्ट वैद्यकीय मदत त्याला मिळावी म्हणून आपापल्या परीने जमेल ती आर्थिक मदत करावी ही विनंती.सोबत दिलेल्या बँक अकाऊंट, gpay no किंवा QR code वरून आपण ही मदत करू शकता. नितीन आर्ट सोबत ज्या ज्या प्रॉडक्शन्स हाऊसेस काम केले आहे आणि त्यांचे पेमेंट नितीन ला देणं आहे त्यांनीही कृपया जुनी पेमेंट्स क्लिअर करून या नितीनच्या अडचणीच्या काळात सहकार्य करावे, ही कळकळची विनंती.”

Web Title: Art director nitin borkar died

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 07:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.