(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जेम्स कॅमेरॉन यांच्या विज्ञान-कथा चित्रपट “अवतार: फायर अँड अॅशेस” ने जागतिक बॉक्स ऑफिसवर ११,२०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. तो १९ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून ओटीटीची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.
जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित “अवतार ३” ला जगभरातील प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाले. जगभरात या चित्रपटाने ११,२०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.भारतात, सर्व भाषांमध्ये या चित्रपटाने १७० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. आता, चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर, तो लवकरच तुम्हाला घर बसल्या पाहता येणार आहे. वृत्तानुसार, तो भारतात JioHotstar वर ऑनलाइन स्ट्रीम होईल. निर्मात्यांनी अद्याप याची पुष्टी केलेली नाही. तो एप्रिल ते जून दरम्यान स्ट्रीम होईल.
जेम्स कॅमेरॉन यांनी आधीच अवतार ४ आणि अवतार ५ ची घोषणा केली आहे, जे २०२९ आणि २०३१ मध्ये प्रदर्शित होतील.
”मी माफ करणार नाही..”, गोविंदाच्या अफेअरबद्दल पत्नीचा खुलासा, सुनीता आहुजा म्हणाल्या, ”पैसे संपतील तेव्हा..”
जेम्सने १९८२ मध्ये ‘पिरान्हा II: द स्पॉनिंग’ बनवले. त्यानंतर त्यांनी १९८४ मध्ये ‘द टर्मिनेटर’, १९८६ मध्ये ‘एलियन्स’, १९८९ मध्ये ‘द अॅबिस’, १९९१ मध्ये ‘टर्मिनेटर २’, १९९४ मध्ये ‘ट्रू लाईज’, १९९७ मध्ये ‘टायटॅनिक’, २००९ मध्ये ‘अवतार’ बनवले. २०२२ मध्ये ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’, २०२५ मध्ये ‘अवतार: फायर अँड अॅश’. जेम्सच्या ‘टर्मिनेटर’ आणि ‘अवतार’ या चित्रपटांचे आजपर्यंत कौतुक होत आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही भरपूर कमाई केली.






