Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सर्कस’ला प्रतिसाद मिळेना; कलाकारांवर उपासमारीची वेळ

रॅम्बो सर्कस खेळाला चांगला दर्जा मिळावा आणि सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी सर्कस मधील कलाकार आणि सुजित दिलीप यांनी नवराष्ट्राशी बोलताना केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 14, 2026 | 01:07 PM
'सर्कस'ला प्रतिसाद मिळेना; कलाकारांवर उपासमारीची वेळ

'सर्कस'ला प्रतिसाद मिळेना; कलाकारांवर उपासमारीची वेळ

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘सर्कस’ला प्रतिसाद मिळेना
  • कलाकारांवर उपासमारीची वेळ
  • रोजीरोटीचा प्रश्नही सुटेना
पुणे/गायत्री पवळे : पुण्यामध्ये हडपसरला सुरू असणाऱ्या रॅम्बो सर्कस मधील कलाकारांना पुरक उत्पन्न मिळत नसल्याने ते कलाकार लहान लहान वस्तू विकून सर्कसमधे दुखापत झालेल्या कलाकारांच्या दवाखान्याचा खर्च करतात. त्याचप्रमाणे सर्कस मधील एका मुलीला कर्करोग झाल्याने त्यासाठीही ह्या कलाकारांनी होईल त्या मार्गाने आर्थिक मदत केली आहे. परिवारासारखे हे कलाकार एकमेकांसाठी झटत असतात.

 

सर्कस म्हणजे केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून, एक कुटुंब असल्यासारखे कलाकार एकमेकांसाठी उभे राहतात. सर्कसमधील कलाकारांच्या गावाहून ये-जा, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील सर्कसच्या कार्यक्रमातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून असते, अशी माहिती सर्कसचे मालक सुजित दिलीप यांनी नवराष्ट्राशी बोलताना दिली.

तसेच भारतात सुरुवात झालेल्या ह्या खेळाला जेवढी विदेशात मागणी आहे तेवढी भारतात नाही ही खंत आहे. महाराष्ट्रात सर्कसला प्रोत्साहन व प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. सर्कस ला अजूनही कसलाही अधिकृत दर्जा मिळालेला नसल्याने ह्या कलेसमोरील अडचणी वाढत आहेत. खेळाचा प्रकार जिवंत राहावा म्हणून रॅम्बोसारखे काही प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.

कोरोना महामारीमध्ये सर्कस बंद होण्याची वेळ आलेली असताना त्या काळात काही प्रमाणात उत्पन्न मिळावे ह्यासाठी सर्कसने ऑनलाइन कार्यक्रम घेण्यास सुरवात केली त्यातही त्यांच्या उत्पनाच्या दुप्पट कर त्यांना भरावा लागला. त्यामुळे ह्या कलाकारांचे खूप हाल झाले आहेत. सध्या सर्कसचे अस्तित्व टिकवण्यासाठी कलाकार झटत असून, प्रेक्षकांनी पुन्हा सर्कसकडे वळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मनोरंजनाची अनेक माध्यमे आल्याने सध्याच्या काळात सर्कस मागे पडत आहे. कलाकारांना त्यांच्या कलेचा आधार असतो त्यातूनच त्यांचे उत्पन्न तयार होते. कला मागे पडत चाललीय, ही काळजीची बाब आहे. फक्त सरकारने नव्हे तर नागरिकांनी सुद्धा ह्याकडे लक्ष दिले पाहिजे. असे कलाकारांनी नवराष्ट्राशी बोलताना सांगितले.

रॅम्बो सर्कस हे सर्व कलाकारांसाठी एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाला जपण्यासाठी प्रत्येक कलाकार जोमाने प्रयत्न करत असतो. ह्या खेळाला चांगला दर्जा मिळावा आणि सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी सर्कस मधील कलाकार आणि सुजित दिलीप यांनी नवराष्ट्राशी बोलताना केली.

हे सुद्धा वाचा : पुणे जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाची तारीख ठरली; प्रशासकांकडून होणार सादरीकरण

Web Title: Artists are in financial trouble as circuses are not getting a response

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्सची दमदार कामगिरी; सर्व सेगमेंटमध्ये नोंदवली उल्लेखनीय वाढ
1

टाटा मोटर्स पॅसेंजर वेहिकल्सची दमदार कामगिरी; सर्व सेगमेंटमध्ये नोंदवली उल्लेखनीय वाढ

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
2

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर
3

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली
4

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.