स्वत: ला WhatsApp ला पाठवला मेसेज अन् संपवलं जीवन, प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शकानं केली आत्महत्या
मराठी फिल्म इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. आशिष उबाळे यांनी ही आत्महत्या नागपूरमधील रामकृष्ण मठामध्ये केली आहे. दिग्दर्शकाने कर्जाच्या बोझ्यामुळे आपले आयुष्य संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आशिष उबाळे हे मूळचे नागपूरचे असून ते महाल परिसरात राहत होते. त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण मराठी फिल्म इंडस्ट्री हळहळून गेली आहे.
‘Hera Pheri 3’ सोडण्याच्या निर्णयावर परेश रावल यांनी केला मोठा खुलासा, काय म्हणाला अभिनेता ?
अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या ‘गार्गी’ चित्रपटाचे असलेले दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी काल (शनिवारी- १७ मे) सायंकाळी ४:३० च्या सुमारास आत्महत्या करत आपले जीवन संपवले. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीतून, नागपूरच्या रामकृष्ण मठामध्ये आशिष उबाळे यांनी आपले जीवन संपवले. स्वत:च्या व्हॉट्सॲप क्रमांकावर सुसाईड नोट लिहित सुप्रसिद्ध दिग्दर्शकानं आपलं जीवन संपवलं आहे. कर्जाच्या बोझ्यामुळे दिग्दर्शकानं आपलं जीवन संपवल्याची माहिती आहे. मुळचे नागपूरचे असलेले दिग्दर्शक प्रतापनगर भागामध्ये असलेल्या वडिलोत्पार्जित घरात राहत होते.
आधी स्टार किड्सना केले टार्गेट, आता अभिनयातून स्वतः घेतला ब्रेक; नक्की बाबिल खानचे चालले तरी काय ?
गेल्या २५ वर्षांपासून ते मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिग्दर्शक आणि लेखक म्हणून सक्रिय होते. अनेक मराठी चित्रपटांचे आणि मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. काही वर्षांपूर्वी नागपूरमधील घर विकून ते आईवडिलांसोबत मुंबईत राहायला आले. मुंबईमध्ये घर घेतल्यानंतर त्यांच्यावर हळूहळू कर्जाचं डोंगर उभं राहत गेलं, ते काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नव्हतं. दिग्दर्शन क्षेत्रात आशिष यांना अपेक्षित यश मिळू शकलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल ते मुंबईवरुन नागपूरमध्ये आले. त्यांचा लहान भाऊ सारंग उबाळे रामकृष्ण मठात सेवेकरी आहे. भावाच्या सांगण्यावरुन ते मठातील एका खोलीत राहिले.
Mithun Chakraborty: बीएमसीने मिथुन चक्रवर्ती यांना पाठवली नोटीस; बेकायदेशीर बांधकाम संबंधित प्रकरण!
आशिष उबाळे यांनी दुपारचं जेवण केलं. शनिवारी दुपारी आराम करण्यासाठी गेस्ट रूम मध्ये गेले. त्यानंतर त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संध्याकाळी चहा घेण्यासाठी भाऊ बोलवायला गेला असता त्याला आशिष यांनी गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं. कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे आशिष उबाळे यांनी आत्महत्या करत असल्याचा व्हॉट्सॲप मेसेज त्यांनी स्वत:लाच पाठवला होता. कर्जाच्या ओझ्यामुळे ते नैराश्यात गेले होते. त्यांच्या आत्महत्येची चौकशी धंतोली पोलिस अधिकचा तपास करत आहेत.
सोनालीला सहन करावा लागलेला मानसिक छळ, सिनेइंडस्ट्री सोडण्याची आलेली वेळ; ‘तो’ एक निर्णय आला कामी
आशिष उबाळे हे उत्तम दिग्दर्शक आणि लेखक असून त्यांनी पुण्यातील एफटीआयमधून पदविकाचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर नशीब आजमावण्यासाठी ते मुंबईमध्ये आले. २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘गार्गी’ सिनेमाची स्क्रीनिंग कार्ल्सबर्ग इंटनरॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाली होती. याशिवाय त्यांनी ‘अग्नी’,’एका श्वासाचे अंतर’,’गजरा’,’चक्रव्यूह’ या मालिकांचं दिग्दर्शन केलं. तसंच ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’,’बाबुरावला पकडा’ हे सिनेमेही दिग्दर्शित केले.