IPL च्या सुरुवातीलाच के. एल. राहुलच्या घरी 'गुड न्यूज'; अथिया शेट्टीने दिला गोंडस मुलीला जन्म
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल आई- बाबा झाले आहेत. आयपीएलच्या १८ व्या हंगामाच्या दरम्यानच चिमुकलीचं आगमन झालं आहे. आथियाने एका गोंडस मुलीला जन्म दिलेला आहे. अभिनेत्रीने काही मिनिटांपूर्वीच इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करत चाहत्यांना ‘गोड बातमी’ दिली आहे. आयपीएलच्या सुरुवातीलाच आथियानेही हटके ‘गुड न्यूज’ दिल्यामुळे चाहते आनंदित आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव आणि कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत आथियाने आपल्या चाहत्यांना सांगितले की, देवाच्या आशिर्वादाने मुलीचा जन्म झाला आहे. आणि पुढे अभिनेत्रीने २४ मार्च २०२५ अशी तारीख दिली आहे. दरम्यान, आथियाने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. टायगर श्रॉफ, मृणाल ठाकूर, क्रिती सेनॉन, कियारा अडवाणी, आयेशा श्रॉफ, शनाया कपूर, अर्जुन कपूर, ईशा गुप्ता सह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच आथिया आणि राहुलने ‘प्रेग्नंन्सी शूट’ केलं होतं. अथिया शेट्टीने सोशल मीडियावर शेअर केलेले बेबी बंपचे फोटो तुफान व्हायरल झाले होते. प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच या कपलने ‘प्रेग्नंन्सी शूट’ केलं होतं. दरम्यान, नोव्हेंबर २०२४ मध्ये, अथिया शेट्टी आणि केएल राहुलने प्रेग्नेंसीची घोषणा केली होते. आथियाने जेव्हा गोड बातमी शेअर केली होती, तेव्हा तिने पोस्टमध्ये लिहिले होते की, “आमचा सर्वात सुंदर आशीर्वाद २०२५ मध्ये येणार आहे…” असं सुंदर कॅप्शन अभिनेत्रीने दिले होते. पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने हृदयांचं सिम्बॉलही दिलेलं आहे.
लक्ष्मीकांत बेर्डेंची दोन्हीही मुलं एकत्र काम करणार? स्वत: अभिनय बेर्डेने दिली माहिती…
लग्नाला दोन वर्षे पूर्ण होण्याआधीच आथिया- राहुलने सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या अनेक वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. डेटिंग केल्यानंतर काही वर्षांतच त्यांनी आपल्या नात्याला नवा टॅग देण्याचा निर्णय घेतला. आथिया आणि राहुलने दोन वर्षांपूर्वी म्हणजेच, २३ जानेवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. या कपलचं लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर पार पडलं होतं. या लग्नाला फक्त दोघांचेही कुटुंबीय आणि क्रिकेटविश्वातील शिवाय फिल्म सिनेइंडस्ट्रीतीलही काही मोजकेच लोकं उपस्थित होते.