dilip joshi reveals one iconic dialogue of taarak mehta ka ooltah chashmah was banned shares reason
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही विनोदी मालिका गेल्या १६ ते १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करताना दिसत आहे. कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत राहिलेली ही मालिका टीआरपीच्या यादीतही अव्वल स्थानावर राहिली आहे. सब टिव्हीवर टेलिकास्ट होणाऱ्या मालिकेचा फार मोठा चाहतावर्ग आहे. मालिकेप्रमाणेच मालिकेतल्या कलाकारांचाही मोठा चाहतावर्ग आहे.
लक्ष्मीकांत बेर्डेंची दोन्हीही मुलं एकत्र काम करणार? स्वत: अभिनय बेर्डेने दिली माहिती…
आपल्या आवडत्या कलाकारांसाठी चाहते आवर्जुन मालिका पाहतात. मालिका पाहता पाहता कलाकार बोलत असलेले काही डायलॉग्जही चाहत्यांच्या तोंडपाठ झाले आहेत. मालिकेतील असे अनेक डायलॉग्स आहेत की, जे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्याचे पाहायला मिळतात. आता जेठालाल गडा ही भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी मालिकेतील एका डायलॉगवर बंदी घातली असल्याचा खुलासा केला आहे.
Phule Trailer: एका क्रांतिकारी युगपुरुषाचा गौरव; ‘फुले’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मालिकेतील गाजलेल्या अनेक संवादांपैकी एक संवाद म्हणजे “ए पागल औरत”. पण याच संवादमुळे ‘तारक मेहता का…’मधील ‘जेठालाल’ची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी अडचणीत सापडले होते. अभिनेते दिलीप जोशी यांनी नुकतेच सौरभ पंतच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. सौरभ पंतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मालिकेतील त्यांच्या एका गाजलेल्या डायलॉगबद्दल भाष्य केलं आहे. मुलाखतीत दिपक जोशी म्हणाले की, “ ‘ए पागल औरत’ हा डायलॉग कधी स्क्रिप्टमध्येच नव्हता. तो मी स्वत: त्या स्क्रिप्टमध्ये घेतला होता. पण मी त्या डायलॉगमुळे अडचणीत आलो होतो. पण माझा हा संवाद चांगलाच गाजला. पण त्या डायलॉगवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. ”
“मालिकेतील जेठालालची बायको जेव्हा दया जेव्हा काहीतरी वेगळ्या गोष्टी करते, तेव्हा जेठालाल हा डायलॉग म्हणतो. प्रेक्षकांना जेठालाल आणि दया यांची ही छोटी- मोठी भांडणं खूप आवडतात. हा डायलॉग प्रेक्षकांना आवडला असला तरी काही जणांनी यावर आक्षेप घेतला. काही महिला संघटनांनी हा डायलॉग महिलांचा अनादर करीत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या निर्मात्यांनी तो डायलॉग वगळण्याचा निर्णय घेतला होता.”,अशी आठवण स्वत: दिलीप जोशी यांनी चाहत्यांना सांगितली.
“रेखीव डोळे अन् नितळ चेहरा…”; मंदाकिनीच्या लेकीला पाहिलंत का ? म्हणाल झेरोक्स कॉपी…
अभिनेता दिलीप जोशी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मालिका सुरु झाल्यापासून कोणताही खंड पडू न देता जेठालालची भूमिका साकारत आहेत. या मालिकेत दिलीप जोशी साकारत असलेल्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय, शिवाय त्यांच्या अभिनयाचं कौतुक अगदी लहानांपासून थोऱ्या मोठ्यांपर्यंत सर्वच करीत आहेत. सर्वच वयोगटातल्या लोकांची जेठालालची भूमिका फेव्हरेट आहे. दिलीप जोशीने अनेक बॉलिवूड चित्रपट आणि गुजराती नाटकांमध्येही काम केलंय.