Abhinay Berde Talked About Working Together With Sister Swanandi
आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांची आजही चाहते आठवण काढतात. लक्ष्या आणि अशोक मामांची जोडी तर तिकीटबारीवर जबरदस्त हिट आणि कमाल चर्चेत राहिलीये. जरीही आज लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यात नसले तरीही त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते आपल्यात जिवंत आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी अभिनेत्री प्रिया बेर्डे आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा अभिनय बेर्डे (Abhinay Berde) अभिनेता असून त्याची धाकटी बहीण स्वानंदीचा (Swanandi Berde)ही देखील अभिनेत्री आहे.
Phule Trailer: एका क्रांतिकारी युगपुरुषाचा गौरव; ‘फुले’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित
अभिनय आणि स्वानंदीने दोघांनीही वेगवेगळ्या चित्रपटांत आणि नाटकांत काम केलं असलं तरीही मात्र त्यांनी एकत्र कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केलं नाही. एका मुलाखतीत अभिनयला भविष्यात बहीण स्वानंदीबरोबर काम करण्याची इच्छा आहे का ? असा प्रश्न विचारला होता. अभिनय बेर्डेने ‘झी नाट्य गौरव’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याला भविष्यात बहीण स्वानंदीबरोबर त्याच्या काम करण्याबद्दल विचारले. तेव्हा ‘इट्स मज्जा’शी बोलताना अभिनयने ‘स्वानंदीबरोबर नक्कीच काम करायला आवडेल’ असं म्हटलं.
“रेखीव डोळे अन् नितळ चेहरा…”; मंदाकिनीच्या लेकीला पाहिलंत का ? म्हणाल झेरोक्स कॉपी…
बहिणीसोबत काम करण्याबद्दल अभिनय असं म्हणाला की, “हो… आम्हाला दोघांनाही एकमेकांसोबत काम करायला नक्की आवडेल. पण ते सहजरीत्या घडलं तर खूप बरं होईल. म्हणजे आम्हा दोघांनाच घेऊन नाटक करायचं आहे म्हणून नाटक लिहा असं नको. कारण ते मला खूप उगाच किंवा मुद्दामहून केल्यासारखं वाटतं. त्यातून चांगलं नाटक होईलच, याची शाश्वती नसते. त्यामुळे चांगलं नाटक किंवा उत्तम संहिता मिळावी. त्यात आमचं कास्टिंग उत्तम असावं. तर आम्ही ते नक्कीच करु.”
दरम्यान, स्वानंदीच्या कामाबद्दल बोलायचं तर, ‘मन येड्यागात झालं’ आणि ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तर अभिनयाच्या कामाबद्दल बोलायचं तर, ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘बांबू’, ‘रंपाट’ आणि ‘बॉईज ४’ सारख्या चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या अभिनयचं ‘आज्जीबाई जोरात’हे नाटक रंगभूमीवर जोरात चालत आहे. या नाटकाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. यात त्याच्याबरोबर अभिनेत्री निर्मिती सावंत, मुग्धा गोडबोले मुख्य भूमिकेत आहे.