Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रदर्शनापूर्वीच आमिर खानच्या मुलाचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, काय आहे कारण? जाणून घ्या

आमिर खानच्या मुलाचा ‘महाराज’ हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. मात्र याआधीच बजरंग दलाकडून याला विरोध करण्यात येत आहे. वेळ पडली तर चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही अशी धमकीही यावेळी देण्यात आली आहे. नक्की प्रकरण काय वाचा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 09, 2024 | 05:58 PM
प्रदर्शनापूर्वीच आमिर खानच्या मुलाचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, काय आहे कारण? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याला आज कोण ओळखत नाही. सध्या चित्रपटसृष्टीपासून आमिर जरी दूर गेला असला तरी त्याचा मुलगा जुनैद खानचा नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जुनैद खान नेहमीच आपल्या सोशल मीडियावर काही ना काही करणास्थव चर्चेत असतो. त्याचे बरेच व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि त्यातच आता तो त्याच्या हिंदी सिनेसृष्टीतील पदार्पणामुळे चर्चेत आहे. लवकरच त्याचा ‘महाराज’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

मध्यंतरी अनेक बॉलीवूड स्टारकिड्स कोणत्या ना कोणत्या चित्रपटात आपले पदार्पण करताना दिसत होते. त्यातच आता वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी आता जुनैद खानदेखील नव्याने सज्ज होताना दिसत आहे. त्याचा ‘महाराज’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 14 जूनला प्रदर्शित होत आहे मात्र त्याआधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

[read_also content=”49 व्या वर्षीही देते तरूणींना मात, शिल्पा शेट्टीचे मनावर राज्य करणारे लुक https://www.navarashtra.com/photos/some-special-photos-of-shilpa-shetty-on-her-birthday-544690.html”]

मागेच जुनैदच्या ‘महाराज’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरमधून जुनैदसह अभिनेता जयदीप अहलावतचा चित्रपटातील पहिला लूक प्रेक्षकांसमोर आला होता. पण याच पोस्टरमुळे विश्व हिंदू परिषदेची युवा संघटना बजरंग दलने आता आक्षेप घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता, बजरंग दलाने यशराज फिल्म्स आणि नेटफ्लिक्सला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एका हिंदू धर्मीय नेत्याची भूमिका नकारात्मक पद्धतीने दाखवण्यात येत आहे. त्यामुळे काही वर्गांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थितीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी बजरंग दलाला दाखवावा, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

हे पत्र गौतम रावरिया यांनी पाठवले असून त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेटफ्लिक्सच्या एका अधिकाऱ्याला पत्र देतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्येही गौतम नेटफ्लिक्सच्या अधिकाऱ्यांना म्हणत आहेत की, जर चित्रपटात काही आक्षेपार्ह आढळले तर बजरंग दल चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. दरम्यान या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत जुनैद (Junaid khan) दिसणार आहे तर त्याच्या विरोधात जयदीप (Jaideep Ahlawat) याला खलनायक दाखवण्यात आले आहे. चित्रपटात जुनैद पत्रकार करसनदास मुलजी यांची व्यक्तिरेखा साकारत आहे, तर जयदीप चित्रपटात महाराजच्या भूमिकेत झळकणार आहे.

 

 

 

Web Title: Bajarang dal takes objections amir khans boy debut mahraj movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2024 | 05:58 PM

Topics:  

  • entertainment
  • Maharaj movie

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.