Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, अनुराग कश्यपच्या चित्रपटातून करणार डेब्यू

बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र जयदेव ठाकरे यांचा मुलगा लवकरच बॉलिवूडमधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. जयदेव ठाकरे यांच्या मुलाचं नाव ऐश्वर्य ठाकरे असं असून तो आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 28, 2025 | 08:12 PM
बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, अनुराग कश्यपच्या चित्रपटातून करणार डेब्यू
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रातल्या राजकारणातील प्रमुख कुटुंबीयांपैकी एक कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब. हे ठाकरे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहे. पण आता या कुटुंबातील एक सदस्य अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र जयदेव ठाकरे यांचा मुलगा लवकरच बॉलिवूडमधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. जयदेव ठाकरे यांच्या मुलाचं नाव ऐश्वर्य ठाकरे असं असून तो आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘जवान’ दिग्दर्शकाचा मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान

प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातून ऐश्वर्य ठाकरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अद्याप या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली नसून तो लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे. राजकीय वारशातून आलेल्या ऐश्वर्यने कुटुंबीयांचा पारंपारिक मार्ग न निवडता स्वत:च्या कतृत्वावर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. २०१५ साली रिलीज झालेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाच्या माध्यमातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. या अनुभवातून त्याला चित्रपट निर्मितीचीही समज मिळाली.

 

‘मुंज्या’च्या यशानंतर सुहास जोशींचा ‘खोताची वाडी’मधील पहिला लूक चर्चेत!

मायकेल जॅक्सनचा मोठा चाहता असलेला ऐश्वर्यची नृत्यातील आत्मविश्वास आणि रंगमंचावरील उपस्थिती लक्षणीय आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की, तो उत्तम डान्सर देखील आहे. अभिनेता आणि निर्माता निखिल द्विवेदीने एकदा म्हटले होते, “तो नक्की लक्ष ठेवण्यासारखा आहे.” ही टिप्पणी त्या वेळी साधी वाटली असली, तरी आज ती त्यांच्या क्षमता ओळखणारी दूरदृष्टी ठरते आहे. अनुराग कश्यप यांच्यासारख्या गंभीर आणि सखोल विषय हाताळणाऱ्या दिग्दर्शकासोबत तो दमदार पदार्पण करतो आहे. कोणत्याही मोठ्या प्रमोशनल मोहिमेशिवाय, ऐश्वर्य आपल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण करत आहेत.

Web Title: Balasaheb thackeray grandson aaishvary thackeray debut in bollywood with anurag kashyap movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 08:12 PM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • Bollywood
  • bollywood movies

संबंधित बातम्या

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
1

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित
2

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित

अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!
3

अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!

Mukesh Khanna on Jaya Bachchan: ‘या बिघडल्या आहेत…’ मुकेश खन्ना यांनी जया बच्चन वर साधला निशाणा
4

Mukesh Khanna on Jaya Bachchan: ‘या बिघडल्या आहेत…’ मुकेश खन्ना यांनी जया बच्चन वर साधला निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.