marathi actress suhas joshi first look in khotachi wadi after the success of munjya bollywood movie
‘मुंज्या’ सारख्या सुपरहिट चित्रपटानंतर आता मराठीत पुन्हा एकदा हॉररची लाट येतेय की काय…? अशी चर्चा रंगू लागली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या अल्ट्रा झकास ओरीजिनल्सच्या ‘खोताची वाडी’च्या सेटवर दिसल्या आणि तेव्हापासूनच प्रेक्षकांचं लक्ष तिकडे वळलं आहे. गंभीर चेहऱ्यानं त्या नदीकिनारी उभ्या असलेल्या त्यांच्या फोटोने एक वेगळीच उत्सुकता निर्माण केली आहे. आता वेब सिरीजमध्ये त्यांची भूमिका नेमकी काय आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण ‘मुंज्या’नंतर मराठी हॉररमध्ये सुहास जोशी यांना पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे!
राधा आणि पिंगा गर्ल्सना वेगळं करण्याचा भुतेंचा प्लॅन यशस्वी होईल का?
अल्ट्रा मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड आजवर चित्रपटांचं वितरण, होम व्हिडीओ, सॅटेलाइट आणि डिजिटल कंटेंटच्या क्षेत्रात सक्रिय राहिली आहे. त्याचबरोबर त्यांनी उत्तम दर्जाच्या मराठी ओरिजिनल कंटेंटकडेही विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. यामध्ये IPC, सौभाग्यवती सरपंच यांसारख्या पुरस्कार विजेत्या वेब सिरीजचा समावेश आहे.
खोताची वाडी म्हणजे नक्की काय? ही जागा खरी आहे का? इथे काही भीषण घटना घडली होती का? की ही जागा खास या वेब सिरीजसाठी तयार केली आहे का? अशाच अनेक प्रश्नांनी प्रेक्षकांचं कुतूहल वाढवलं असून हि वेब सिरीज लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे.
डॉ. कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषचीच निवड का केली? ओम राऊतने सांगितला किस्सा
निर्माते व अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “‘खोताची वाडी’ ही गोष्ट फक्त भुतांच्या वाड्याची असू शकते, किंवा मनातल्या भीतीचीही असू शकते. आम्ही अल्ट्रा झकासवर असंच वेगळं आणि दमदार मनोरंजन घेऊन येण्याच्या प्रयत्नात असतो. ‘खोताची वाडी’ हे त्याचं एक भारी उदाहरण आहे.”
राजेश चव्हाण, जे “IPC” सारख्या पुरस्कार विजेत्या वेब सिरीजचं दिग्दर्शन करून नावाजले गेले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणारी ही नवीन वेब सिरीज त्यांच्या सिनेमॅटिक शैलीसाठी ओळखला जाणारा एक प्रोजेक्ट ठरणार आहे. ही वेब सिरीज केवळ मनोरंजनापुरती नसेल, तर प्रेक्षकांसाठी एक नवा रोमांचक अनुभव असेल.
शुटिंग दरम्यान इमरान हाश्मीची तब्येत बिघडली, अभिनेत्याला काय झालं ?
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट ग्रुप गेली चार दशके भारतीय मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य राहिला आहे. व्हीएचएसच्या काळापासून ते आजच्या ओटीटी युगापर्यंतचा प्रवास त्यांनी जपलेला आहे. त्यांच्या १५० हून अधिक यूट्यूब चॅनेल्स आणि तीन प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे अल्ट्रा आजही स्थानिक भाषिक कंटेंटसाठी एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म बनलं आहे.