Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बालपणीच वडिलांचं छत्र हरपलं, खाण्याचेही होते वांदे; कॉमेडी किंग भारती सिंगचा इंडस्ट्रीतील खडतस प्रवास, एकदा वाचाच

छोट्या पडद्यावरची 'लाफ्टर क्वीन' अशी ओळख मिळवणाऱ्या भारती सिंहचा आज (३ जुलै) वाढदिवस आहे. पंजाबमधल्या अमृतसरमध्ये लहानाची मोठी झालेली भारती आज आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jul 03, 2025 | 07:45 AM
बालपणीच वडिलांचं छत्र हरपलं, खाण्याचेही होते वांदे; कॉमेडी किंग भारती सिंगचा इंडस्ट्रीतील खडतस प्रवास, एकदा वाचाच

बालपणीच वडिलांचं छत्र हरपलं, खाण्याचेही होते वांदे; कॉमेडी किंग भारती सिंगचा इंडस्ट्रीतील खडतस प्रवास, एकदा वाचाच

Follow Us
Close
Follow Us:

छोट्या पडद्यावरची ‘लाफ्टर क्वीन’ अशी ओळख मिळवणाऱ्या भारती सिंहचा आज (३ जुलै) वाढदिवस आहे. पंजाबमधल्या अमृतसरमध्ये लहानाची मोठी झालेली भारती आज आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. टीव्हीवर नावाजलेल्या ‘लल्ली’ या पात्राने भारती देशभरात प्रसिद्ध झाली. स्टँडअप कॉमेडियन असण्यासोबतच तिने अनेक रिॲलिटी शो देखील होस्ट केले आहेत. लोकप्रियतेच्या बाबतीत, ती अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींशी स्पर्धा करते. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज-३’द्वारे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या भारती सिंहचे आयुष्य खूप खडतर होते. पडद्यावर सर्वांना हसवणाऱ्या भारतीचे वैयक्तिक आयुष्य अनेक चढ- उतारांनी भरलेले होते. वडील गेल्यानंतर आईने मोठ्या कष्टाने तिला शिकवले.

“प्रवास सोप्पा नव्हता, काही कलाकार सोडून गेले…” अपूर्वाचा रोख कोणाकडे? शेवटच्या दिवसाच्या शूटिंगनंतर केली पोस्ट

‘लाफ्टर क्वीन’म्हणून टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या भारती सिंहचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. खुद्द भारती सिंहने एका मुलाखतीदरम्यान याबद्दल सांगितले होते. एका मुलाखतीत भारतीने सांगितले होते की, “तिचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. मी जेमतेम दोन वर्षांचीच असतानाच माझ्या वडिलांचे निधन झाले. तीन भावंडांमध्ये मी सर्वात लहान असल्यामुळे मला गरिबीमुळे लहानपणापासूनच नोकरी करावी लागली होती. वडिलांच्या निधनानंतर आईने लोकांच्या घरी जाऊन जेवण बनवून, त्यातून येणाऱ्या पैशांतून आम्हा तिनही भावांचाही आणि आपला उदारनिर्वाह केला. माझ्यासारखं बालपण कोणालाही मिळू नये, असं मी स्वतः कायम म्हणते. ”

“तू आज असतीस तर…”, क्षिती जोगने शेअर केली आजीसाठी खास पोस्ट; म्हणाली…

मुलाखतीदरम्यान भारतीने सांगितले की, “माझी आई लोकांच्या घरी जाऊन जेवण बनवायची. तेव्हा मी सुद्धा कधी- कधी आईसोबत जायची. आई जेवण बनवायची आणि मी तिच्या बाजूलाच तिथेच बसायची. त्यावेळी स्वयंपाकघर आणि त्यात ठेवलेल्या वस्तू बघून आपलं घर असं कधी असेल का, असा प्रश्न तिला पडायचा. आईने मला आणि माझ्या भावंडांना कष्ट करायला शिकवले होते. त्यामुळे मी आणि माझे भाऊ आज स्वत: च्या मेहनतीने आणि समर्पणाने कुठवर पोहोचले आहेत. मला माझ्या आईने एक गोष्ट सांगितलीये. ती म्हणजे, ‘कठोर परिश्रम करणं कधीही सोडू नका. त्यामुळे मी आणि माझे भावंडांनी आईची आज्ञा पाळली आणि तसेच वागलो.’ ”

‘एक तिची गोष्ट’ नाटकाचा शानदार प्रिमियर, नाट्यप्रेमींकडून कौतुक

एका जुन्या मुलाखतीत भारती सिंहने सांगितलं होतं की, “माझी एका रिॲलिटी शोमध्ये निवड झाली होती आणि मी मुंबईत येण्याच्या तयारीत होते. मात्र, तिथे नातेवाईकांनी आमच्यावर बहिष्कार टाकला होता. ते म्हणायचे की, यांना वडील नाहीत आणि हे असली कामं काय करतात?” बालपणापासून भारतीला प्रचंड उपेक्षा सहन करावी लागली होती. मात्र, आपल्या मेहनत, जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर तिने आज मनोरंजन विश्वात स्वतःचे हक्काचे स्थान निर्माण केले आहे.

Web Title: Bharti singh birthday know laughter queen struggle to comedy show struggle story mother used to clean toilets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 07:45 AM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Actress

संबंधित बातम्या

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
1

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
2

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!
3

‘प्रेमानंद महाराज पाप धुण्याचे मशीन…’, सुपरस्टारच्या पोस्टमुळे उडाली खळबळ; भक्त संतापले!

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
4

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.