Ek Tichi Goshta Marathi Drama Premiere
‘एक तिची गोष्ट’ नृत्यनाट्याचा शानदार प्रिमियर सोहळा रविंद्र नाट्य मंदिर येथे नुकताच संपन्न झाला. सिनेनाट्य, राजकारण, साहित्य, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते.
‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’ या निर्मिती संस्थेने, ‘थिएटरऑन एंटरटेनमेंट’ आणि ‘पी एस डी जी स्टुडिओज प्रोडक्शन’ यांच्या साथीने ‘एक तिची गोष्ट’ रंगमंचावर आणली आहे. ज्येष्ठ लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश चौधरी यांनी ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’ या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेचे सदस्य परी तेलंग आणि शंतनू तेंडुलकर ह्यांचे सहकार्य यासाठी लाभले आहे.
‘Squid Game S3’ ने पहिल्या तीन दिवसांत घातला धुमाकूळ, Netflix चा बनला नवा रेकॉर्ड
या सृजनशील कलाकृतीचे खास आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि त्यांची मुलगी आस्मा खामकर यांच्या संगीत, अभिनय, नृत्याची बहारदार अदाकारी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या दोघींसोबत अभिनेता ओंकार गोखले या नाटकात आहे. याचे लेखन अभिनेता विराजस कुलकर्णी तर सूरज पारसनीस, विराजस कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केले आहे.
‘पारू’ फेम अभिनेत्याचे ‘त्या’ व्हिडिओवर स्पष्टीकरण; म्हणाला, “मी फक्त ‘पारू’ मालिकेबद्दल…”
‘एक तिची गोष्ट’ या नावावरूनच हे नाटक काहीतरी निराळं असणार याची कल्पना येत असली तरी त्याचे सादरीकरण नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. ‘एक तिची गोष्ट’ च्या संपूर्ण टीमचं सध्या नाट्यरसिकांकडून कौतुक होतयं. अचाट, अफाट उर्जा असलेल्या या नाटकाचा हा रंग उत्तरोत्तर असाच चढेल हे निश्चित.