Kshitee Jog Share Emotional Post With For Her Grandmother And Late Actress Shanta Jog
अभिनेत्री क्षिती जोग मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मुख्य बाब म्हणजे, अभिनेत्री क्षिती जोग ही मराठी सिनेसृष्टीतले दिग्गज कलाकार अनंत जोग आणि उज्वला जोग यांची लेक आहे. क्षितीने तिच्या आजवरच्या सिनेकरियरमध्ये, मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांसोबतच बॉलिवूड चित्रपटांतही काम केलं आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या क्षितीने स्वत:ची एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.
‘एक तिची गोष्ट’ नाटकाचा शानदार प्रिमियर, नाट्यप्रेमींकडून कौतुक
अभिनेत्री क्षिती जोग हिने इन्स्टाग्रामवर तिच्या आजीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. क्षिती जोग हिने आजीच्या जन्मशताब्दीनिमित्त एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. क्षितीने इन्स्टाग्रामवर आजी शांता जोग यांचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. या फोटोसह क्षिती असं म्हणते, “शांता आज्जी… आपण कधी भेटलो नाही, मी तुला काम करताना पाहिलं नाही… हे माझं दुर्दैव… तुझ्या कामाचं कौतुक आणि तुझी प्रतिभा सगळ्यांकडून ऐकत आले… नटसम्राट, हिमालयाची सावली, सुर्याची पिल्ले, मंतरलेली चैत्रवेल आणि बरीच… ही सारी तू अजरामर केलेली नाटकं! मराठी रंगभूमीवरचं तुझं योगदान आम्हाला ठेंगणं करणारं आहे… तुझ्या पावलांवर पाऊल ठेवत काम करण्याचा प्रयत्न करते आहे… तुझे आशीर्वाद सतत सोबत असूदे! तुझ्या हिमालयाची सावली अशीच असूदे! आज अभिमानाने ‘शांताबाईंची नात’ म्हणून मिरवते आहे आणि ती मोठी जबाबदारी आहे हे सुद्धा ठाऊक आहे… तू आज असतीस तर खूप काही शिकता आलं असतं बोलता आलं असतं… आज तू असतीस तर १०० वर्षांची असतीस आज्जी! जिथे कुठे असशील तिथे खूप खुश रहा… हे तुझं जन्म शताब्दी वर्ष! तुझा वसा मी विसरणार नाही!”
शांता जोग यांचं अपघाती निधन झालं होतं. ‘मंतरलेली चैत्रवेल’ नाटकाच्या दौऱ्यादरम्यान, ५ एप्रिल १९८० रोजी त्यांच्या बसला अपघात झाला. या अपघतात शांता जोग आणि जयराम हर्डिकर यांचा मृत्यू झाला. दरम्यान, क्षितीने आजीसाठी शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेक कलाकार व चाहत्यांनी शांता जोग यांना आदरांजली वाहिली आहे.