Bigg Boss 19 च्या स्पर्धकांची यादी आली समोर (फोटो सौजन्य - Instagram)
‘बिग बॉस १९’ या लोकप्रिय रियालिटी शो ची तयारी जोरात सुरू आहे. सलमान खान या महिन्यात २४ ऑगस्ट रोजी या शोचा ग्रँड प्रीमियर होस्ट करणार आहे. शोचा ट्रेलर आला आहे आणि यावेळी त्याची थीम ‘राजकारण’ आहे त्यामुळे आता सर्वांनाच उत्सुकता आहे की यावेळी नक्की वेगळं काय असणार?
आता शो सुरू होण्यासाठी फक्त १५ दिवस शिल्लक असताना, त्याच्या स्पर्धकांबद्दल सर्व प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. दिव्यांका त्रिपाठी ते रीम शेख आणि रॅपर रफ्तार ते मल्लिका शेरावत अशी नावे याआधी समोर आली होती. पण निर्मात्यांनी सहमती दर्शवली नसल्याचे समजते. आता एक नवीन यादी समोर आली आहे, ज्यामध्ये १६ सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरची नावे आहेत. युट्यूबर पुरव झा आणि पायल गेमिंग म्हणून प्रसिद्ध असलेली गेमर पायल धारे हे दोन्ही स्पर्धक निश्चित करण्यात आले आहेत.
एकूण 19 स्पर्धक
यावेळी ‘बिग बॉस १९’ मध्ये एकूण १९ स्पर्धक असतील असेही सांगण्यात येत आहे. त्यापैकी १६ जण भव्य प्रीमियरच्या दिवशी घरात प्रवेश करतील, तर ३ जण वाईल्ड कार्ड स्पर्धक असतील. शो च्या थीमनुसार, सलमान पहिल्याच दिवशी स्पर्धकांचे दोन गट तयार करेल, जे त्यांचा नेता निवडतील आणि निवडणूक लढवतील. मतांच्या संख्येनुसार, विजेता ‘घराचा नेता’ असेल आणि स्वतःचे सरकार स्थापन करेल. तर विरोधी पक्षाला वेळोवेळी गुप्त कामं देऊन सरकार पाडण्याची संधी मिळेल.
पुरव झा आणि पायल धारे कन्फर्म
नवीन अहवालानुसार, पायल धारे नंतर, YouTuber पुरव झा हा शो चा निश्चित स्पर्धक आहे. असेही म्हटले गेले आहे की शोच्या निर्मात्यांनी यापूर्वी YouTubers ना सीझन १९ मधून बाहेर ठेवण्याचा विचार केला होता, परंतु नंतर OTT फर्स्ट स्ट्रॅटेजी लक्षात घेऊन, टीव्ही स्टार्ससह डिजीटल निर्मात्यांनादेखील समाविष्ट केले जात आहे.
४५ सेलिब्रिटी आणि डिजीटल निर्मात्यांना ऑफर
दरम्यान निर्मात्यांनी ‘बिग बॉस १९’ साठी आतापर्यंत ४५ हून अधिक टीव्ही सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरशी संपर्क साधला आहे अशी माहिती समोर आली आहे. त्यापैकी अनेकांनी ऑफर नाकारली असली तरी, अनेकांशी चर्चा अंतिम टप्प्यात आहे. या सीझनमध्ये टेलिव्हिजनच्या लोकप्रिय चेहऱ्यांसह, संगीत आणि डिजीटल निर्मात्यांच्या जगातील नावेदेखील समाविष्ट केली जातील. पुढील आठवड्यापर्यंत ही नावे निश्चित केली जातील.
सलमानच्या शोमध्ये ‘हे’ स्टार्स दिसू शकतात
आता नवीन अहवालात समोर आलेल्या १६ सेलिब्रिटींच्या यादीमध्ये अभिनेता शरद मल्होत्रा, धीरज धुपर आणि लता सभरवाल यांच्याशिवाय गौरव खन्ना, अपूर्वा माखिजा, हुनर हाले, शैलेश लोढा, गुरचरण सिंग, मिस्टर फैजू, गायक श्रीराम चंद्र, धनश्री वर्मा, अभिनेत्री मुग्धा चापेकर, मीरा देवस्थळे आणि संगीतकार अमल मलिक यांचा समावेश आहे. दरम्यान दिव्यांका त्रिपाठी, एलनाझ नोरोझी यांनी ऑफर नाकारली, रफ्तारशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
बातमी फेटाळली
एक दिवसापूर्वी दिव्यांका त्रिपाठी देखील शोमध्ये सामील होण्याची तयारी करत असल्याची बातमी आली होती. परंतु अभिनेत्रीने हे दावे फेटाळले आहेत. त्याचप्रमाणे ‘द ट्रेटर्स’ची विजेती एलनाझ नोरोझीचे नावही समोर आले होते, परंतु अभिनेत्रीने स्पष्ट केले की ती शो चा भाग बनत नाही. अशीही चर्चा होती की निर्मात्यांनी एलनाझला ६ कोटी रुपये देऊ केले होते. रॅपर रफ्तारचे नावही चर्चेत आहे. तो अलीकडेच ‘द ट्रेटर्स’ मध्येही दिसला होता. परंतु येथेही चर्चा सुरू असल्याचे समजते.
कोण आहे ‘हे’ लेस्बियन कपल? ज्यांनी ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करताच सोशल मीडियावर उडाली खळबळ
‘बिग बॉस १९’ टीव्हीवरून ओटीटीवर येणार
ट्रेलर रिलीजसोबतच, निर्मात्यांनी असेही जाहीर केले आहे की यावेळी ‘बिग बॉस १९’ टीव्हीपूर्वी ओटीटीवर प्रसारित केला जाईल. हो, या डिजिटल फर्स्ट स्ट्रॅटेजीअंतर्गत, दररोज रात्री ९ वाजता JioHotstar वर एक नवीन एपिसोड प्रथम प्रसारित केला जाईल. तर ९० मिनिटांनंतर, तोच एपिसोड ‘कलर्स टीव्ही’ वर प्रसारित केला जाईल. याशिवाय, OTT वर २४ तासांचे लाईव्ह टेलीकास्ट देखील केले जाईल.