
फोटो सौजन्य - JioHotstar Reality
बिग बॉस १९” चा ग्रँड फिनाले काल पार पडला आणि या शोचा 19 व्या सिझनचा विजेता गौरव खन्ना याला घोषित करण्यात आले आहे. सोशल मिडियावर या ग्रॅन्ड फिनालेचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सलमान खानने काल घरातल्या स्पर्धकांची खिल्ली उडवली तर काही स्पर्धकांची कौतुक केले. “बिग बॉस १९” च्या ग्रँड फिनाले दरम्यान, शोचा होस्ट सलमान खान भावुक झाला. त्याने घरातील सदस्यांना सांगितले की हिंदी चित्रपटसृष्टीतील ही-मॅन धर्मेंद्र आता या जगात राहिले नाहीत.
धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी ऐकून “बिग बॉस १९” च्या फायनलिस्टना धक्का बसला. त्यानंतर सलमान खान आणि शोच्या स्पर्धकांनी उभे राहून दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आणि त्याचे अश्रू अनावर झाले आणि सलमान खान ढसाढसा रडायला लागला. सलमान खान म्हणाला, “तुम्ही आत असताना, आम्ही आमचा ही-मॅन गमावला. आम्ही सर्वात अद्भुत माणूस गमावला. मला वाटत नाही की धरमजींपेक्षा चांगला कोणी असेल. त्यांनी त्यांचे आयुष्य अगदी मनापासून जगले. त्यांनी ६० वर्षे लोकांचे मनोरंजन केले. त्यांनी आम्हाला सनी देओल, बॉबी देओल आणि ईशा देओल दिले.”
सलमान खान पुढे म्हणाला, “सर्वात खास गोष्ट म्हणजे चित्रपटसृष्टीत आल्यापासून शेवटपर्यंत त्याचे एकच स्वप्न होते: काम करणे, चांगले काम करणे. त्याने सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. त्याने विनोदी भूमिका केल्या आहेत, रोमान्स केला आहे, नाटक केले आहे. त्याने सर्व प्रकारच्या भूमिका अतिशय कौशल्याने केल्या आहेत. माझ्या करिअर ग्राफमध्ये मी फक्त धरमजींना फॉलो केले आहे, इतर कोणत्याही अभिनेत्याला नाही कारण त्याचा निष्पाप चेहरा आणि शरीरयष्टी ही-मॅनसारखी होती. तो एक आकर्षक व्यक्तिरेखा, एक ऊर्जा घेऊन आला आणि तो शेवटपर्यंत त्याच्यात होता. प्रेम धरमजी.”
Finale night ka sabse heartfelt pal, jab Salman Khan Dharmendra ji ki yaad mein apne emotions rok nahi paaye. 🥹 Dekhiye #BiggBoss19 ka Grand Finale, aaj raat 9 baje, #JioHotstar aur #ColorsTV par! Watch Now:- https://t.co/XNlwzrEgyf pic.twitter.com/OXTww19dfq — JioHotstar Reality (@HotstarReality) December 7, 2025
यावेळी सलमान खानने धर्मेंद्र यांचे कौतुक केले आणि त्यांनी इंडस्ट्री आणि लोकांसाठी किती दिले आहे हे सांगितले. याशिवाय, शोबद्दल बोलायचे झाले तर, यावेळी सलमान खानच्या शो बिग बॉस १९ मध्ये १८ स्पर्धक आले होते. यावेळी सलमानच्या शोमध्ये अशनूर कौर, झीशान कादरी, तान्या मित्तल, नगमा मिराजकर, अवेज दरबार, नेहल चुडासमा, अभिषेक बजाज, बसीर अली, गौरव खन्ना, नतालिया जानोस्झेक, प्रणीत मोरे, फरहाना भट्ट, नीलम गिरी, कुनिका सदानंद, मृदुल तिवारी आणि अमाल मलिक आणि शाहबाज स्पर्धक होते. याशिवाय मालती वाइल्ड कार्ड म्हणून शोमध्ये आली होती.