Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 19 Winner: ‘ट्रॉफी तो मैं ही’…अखेर बिग बॉस 19 च्या ट्रॉफीवर कोरले गौरव खन्नाने नाव! संपूर्ण इंडस्ट्री खुष

Bigg Boss 19 चा विजेता अखेर घोषित झालाय. सलमान खानने सर्वांसमोर नाव घोषित करत गौरव खन्नाला ट्रॉफी प्रदान केली. गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट या दोघांनी एकमेकांनी चांगलीच चुरस दिली.

  • By अमृता यादव, दिपाली नाफडे
Updated On: Dec 08, 2025 | 12:04 AM
Bigg Boss 19 चा विजेता (फोटो सौजन्य - Instagram)

Bigg Boss 19 चा विजेता (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

‘बिग बॉस 19’ च्या ग्रँड फायनलमध्ये आज अखेर विजेत्याचे नाव जाहीर झाले आहे! गौरव खन्नाने या सीझनच्या स्पर्धेत आपली पकड मजबूत ठेवली आणि त्याने इतर सर्व स्पर्धकांना मागे टाकत विजेतेपद मिळवले. फरहाना भट्टने गौरवला कमालीची टक्कर दिली. स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात अनेक रोमांचक आणि भावनिक क्षण पाहायला मिळाले. सलमान खानच्या “बिग बॉस १९” च्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये गौरव खन्ना, प्रणीत मोरे, फरहाना भट्ट, अमाल मलिक आणि तान्या मित्तल यांचा समावेश होता. हे सर्व प्रेक्षकांच्या मनावर ठराविक छाप सोडून गेले आहेत. ‘बिग बॉस 19’ चा ग्रँड फिनाले मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अनेक परफॉर्मन्स झाले.

विजेता गौरव खन्नानला 50 लाख रूपये बक्षीस आणि आकर्षक ट्रॉफी देण्यात आली आहे. त्याने आपली खेळी एकदम ताकदीने केली होती. या सीझनमध्ये अश्याच अनेक धमाकेदार घटनांमुळे हा सीझन अजूनच खास बनला. विजेताच्या विजयाबद्दल सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उत्साह पाहायला मिळत आहे.  ‘बिग बॉस 19’ चा समारोप झाला असला तरी प्रेक्षक आता पुढील सीझनची वाट पाहत आहेत.

पवनसिंहची ग्रँड एंट्री

बिग बॉस 19 च्या ग्रँड फिनालेमध्ये भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग परफॉर्म यांनी परफॉर्मन्स केला. मात्र, फिनालेपूर्वीच लॉरेन्स बिश्नोई टोळीने त्याला धमकी दिल्याचे वृत्त आहे. बिश्नोई टोळीने त्याला सलमानसोबत काम करू नये नाही तर वाईट परिणांमा सामोरे जावे लागेल अशी धमकी दिली. मात्र तरीही पवनसिंहने या ग्रँड फिनालेला उपस्थिती दर्शवली होती. भोजपुरी स्टार पवनसिंहसह नीलमनेदेखील डान्स केला आणि ग्रँड फिनालेला रंगत आणली.

अमाल मलिक सर्वात पहिले आऊट झाला

पवन सिंगने बेदखल करण्याचे काम सुरू केले आणि त्याने सोबत पोस्टर्स आणले होते, ज्यावर “सेव्ह” आणि “बेदखल” लिहिलेले होते. बिग बॉसने असेंब्लीला बेदखल करण्याचे खोली म्हणून घोषित केले. स्पर्धकांच्या कुटुंबियांना कोडी देण्यात आल्या आणि पोस्टर्स पूर्ण करण्यास सांगितले. तान्याचा भाऊ, फरहानाची आई, गौरवची पत्नी आणि प्रणितची आई यांनी पोस्टर्स पूर्ण केले. तथापि, अमाल अयशस्वी झाला आणि त्याला बेदखल करण्यात आले.

वडील बस कंडक्टर, पायलट बनण्याचं स्वप्न, ‘बिग बॉस 19’ च्या फायनालिस्ट Pranit Moreचा संघर्ष

तान्या आली घराबाहेर 

अमालपाठोपाठ तान्या घराबाहेर आली आणि त्यानंतर तिने आपण ट्रॉफी जिंकलो नसलो तरीही नाव कमावले असल्याने समाधानी असल्याचे सांगितले. तान्याची यावेळीही सलमानने मस्करी केली आणि आपल्याला किती खोटं बोलावं लागतं याबाबत त्याने सांगितले.

सलमान झाला भावूक 

यावेळी धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ दाखविण्यात आला आणि सलमान खूपच भावूक झाला. धर्मेंद्र हा आपल्या आयुष्यातील एकमेव आदर्श हिरो असल्याचे सांगत त्याने आदरांजली वाहिली. तसंच त्याच्या डोळ्यातील अश्रू यावेळी त्याला आवरता आले नाहीत आणि खूपच इमोशनल होत त्याने धर्मेंद्रच्या आठवणी सांगितल्या. आपल्या वडिलांच्या वाढदिवशी धर्मेंद्र यांचे निधन झाल्याचे खूपच दुःख असल्याचे सांगितले.

प्रणित मोरे आऊट, फरहाना आणि गौरव टॉप २ मध्ये 

वोटिंगनुसार प्रणित मोरे तिसऱ्या क्रमांकावर बाहेर आला आणि त्यानंतर १० मिनिट्ससाठी वोटिंग लाईन ओपन करण्यात आली. यातून फऱहाना आणि गौरव या दोघांपैकी विजेता ठरविण्यात येणार असल्याचे सलमानने सांगितले. दरम्यान कुनिका, नेहल आणि फरहानाचा परफॉर्मन्स दाखविण्यात आला.

सगळे स्पर्धक उपस्थित 

यावेळी एकमेकांमध्ये कितीही दुरावा आणि रागरुसवा असला तरीही ग्रँड फिनालेसाठी सर्व स्पर्धक हजर राहिले होते. यावेळी ग्रँड फिनालेच्या वेळीही बशीर आणि नेहल दोघांमध्ये भांडण झाल्याचे दिसून आले. तर ५ फायनल स्पर्धकांमध्ये शेवटपर्यंत चुरशीची लढत पहायला मिळाली. गौरव आणि फरहानामध्ये चुरशीची लढत झाली आणि अखेर बिग बॉस १९ चा विजेता मिळाला.

Bigg Boss 19 Promo: फरहाना पासून गौरवपर्यंतचा धमाकेदार परफॉर्मन्स; वोटिंग लाईन बंद, कोण होणार विजेता?

Web Title: Bigg boss 19 winner gaurav khanna got the trophy with 50 lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 11:47 PM

Topics:  

  • bigg boss 19
  • Gaurav Khanna
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 Grand Finale Live Updates: बिग बॉसचा विजेता ठरला! गौरव खन्नाने उचलली ट्रॉफी
1

Bigg Boss 19 Grand Finale Live Updates: बिग बॉसचा विजेता ठरला! गौरव खन्नाने उचलली ट्रॉफी

वडील बस कंडक्टर, पायलट बनण्याचं स्वप्न, ‘बिग बॉस 19’ च्या फायनालिस्ट Pranit Moreचा संघर्ष
2

वडील बस कंडक्टर, पायलट बनण्याचं स्वप्न, ‘बिग बॉस 19’ च्या फायनालिस्ट Pranit Moreचा संघर्ष

Bigg Boss 19 Promo: फरहाना पासून गौरवपर्यंतचा धमाकेदार परफॉर्मन्स; वोटिंग लाईन बंद, कोण होणार विजेता?
3

Bigg Boss 19 Promo: फरहाना पासून गौरवपर्यंतचा धमाकेदार परफॉर्मन्स; वोटिंग लाईन बंद, कोण होणार विजेता?

एकच हृदय आहे कितीवेळा जिंकणार! सलमान खानने घेतली छोट्या चाहत्यांची भेट, Viral Video मध्ये दिसली गोड केमिस्ट्री
4

एकच हृदय आहे कितीवेळा जिंकणार! सलमान खानने घेतली छोट्या चाहत्यांची भेट, Viral Video मध्ये दिसली गोड केमिस्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.