“बिग बॉस मराठीला तू कलंक होतास”, घनःश्याम दरवडेचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत प्रसिद्ध अभिनेत्रीचा खोचक टोला
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची अजूनही चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या सीझनचा ग्रँड फिनाले झाला. यामध्ये सूरज चव्हाणने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरले आहे. बिग बॉसच्या सीझनमधले सगळेच सदस्य कायमच चर्चेत राहिले आहेत. या सदस्यांपैकी एक जण म्हणजे, छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडे. हा सदस्य सहाव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर गेला होता. सध्या ह्याची इन्स्टाग्रामवर एक मुलाखत व्हायरल होत आहे, या व्हायरल मुलाखतीत त्याच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. त्याच्या त्या वक्तव्यावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील वाचा – मृत्यूआधी काय आहे शाहरुखची शेवटची इच्छा? किंग खानने केला स्वतः खुलासा!
“मी कधी बिग बॉसच्या घरात राजकारण केलं नाही”, असं वक्तव्य त्या घनःश्यामने एका मुलाखतीत केले होते. त्याची व्हायरल होणारी मुलाखत इन्स्टा स्टोरीवर शेअर करत, एका मराठी अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे; जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. ‘लोकशाही मराठी’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत घन:श्याम दरवडे म्हणाला की, “मी जर ठरवलं असतं ना, मला राजकारण करायचंय बिग बॉसच्या घरात तर चुटकी सरशी मला वेळ नसता लागला मला राजकारण करायला. कारण मला माहिती आहे, कोण किती विक आहे, कोण किती विचार करणारे आहेत. पण मी माझ्या सदस्यांना कधीच विक समजलं नाही. मी जर राजकारण करून खेळलो असतो तर मला जास्त वेळ घरात राजकारण करायला लागला नसता. पण, मी घरातील एक सदस्य म्हणून खेळलो ते मला आज आठवतंय.”
घन:श्याम दरवडेच्या ह्या मुलाखतीचा व्हिडिओ इन्स्टा स्टोरीवर शेअर करत अभिनेत्री प्रणित हाटेने त्याच्यावर टिका केली आहे. शेअर केलेल्या स्टोरीमध्ये अभिनेत्री लिहिते की, “हड मेल्या…’बिग बॉस मराठी’ ला तू कलंक होतास…” प्रणितने पोस्टच्या माध्यमातून मारलेल्या खोचक टोल्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. छोटा पुढारी एक सुप्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लूएंसर असून त्याच्या राजकारणी स्टाईलने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याला बिग बॉसच्या घरात कमी मतं पडल्यामुळे त्याला सहाव्या आठवड्यातच घरातून बाहेर पडावे लागले होते.
हे देखील वाचा – मृत्यूच्या दारातून परतला YouTuber अरमान मलिक? शेअर केला व्हिडीओ म्हणाला ‘मरता मरता…’