(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये दिसलेला प्रसिद्ध यूट्यूबर अरमान मलिकचा भीषण अपघात झाला असता परंतु तो या अपघातून वाचला आहे. ज्याची माहिती त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून दिली आहे. अरमान मलिकने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की, तो मनालीला एका गाण्याच्या शूटिंगसाठी गेला होता. तेथून परतत असताना त्यांच्या नवीन गाडीचा टायर पूर्णपणे निकामी झाला, त्यामुळे त्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीव गमवावा लागला असता परंतु या मोठ्या संकटातून हे वाचले आहेत. अरमान मलिकचा हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अरमान मलिकने सांगितली संपूर्ण घटना
यूट्यूबर अरमान मलिकने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते सांगत आहेत, ‘आज एक आठवड्यापूर्वी मी या वाहनाबाबत तक्रार केली होती. आज याच्यासोबतही असेच घडले, आज आम्ही शूटिंग करून मनालीहून येत होतो, तेव्हा गाडीचा संपूर्ण टायर फुटला. मृत्यूच्या दारातून आम्ही वाचलो आहोत.’ असे तो म्हणाला. अरमान मलिक पुढे म्हणाला, ‘मी कारमध्ये झोपलो होतो आणि योगेश गाडी चालवत होता. कृतिका मागे होती. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आज आम्ही मरण्यापासून वाचलो आहोत.’ असे लिहून त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
हे देखील वाचा – कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र, रिलीजची तारीख लवकरच होणार जाहीर!
दोन बायका असल्यामुळे अरमान मलिकला खूप ट्रोल करण्यात आले
यूट्यूबर अरमान मलिकने दोनदा लग्न केले आहे. त्याचे पहिले लग्न पायलसोबत तर दुसरे लग्न पायलची बेस्ट फ्रेंड कृतिकासोबत झाले होते. अरमान मलिकने अनिल कपूरच्या शोमध्ये सांगितले होते की, पायलला भेटल्याच्या एका आठवड्यातच त्याने लग्न केले आणि कृतिकाला भेटल्यावरही असेच काहीसे घडले. YouTuber ची ही गोष्ट समोर आल्यानंतर, त्याला खूप ट्रोल करण्यात आले, अगदी बिग बॉसच्या काही माजी स्पर्धकांनी आणि सेलिब्रिटींनी YouTuber वर प्रश्न उपस्थित केले. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये, पायलला दुसऱ्या आठवड्यात घरातून बाहेर काढण्यात आले होते, तर कृतिक मलिक टॉप 5 चा भाग होती.