(फोटो सौजन्य- Social media)
हिंदी सिनेसृष्टीचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानने १९८९ मध्ये ‘फौजी’ या टीव्ही शोमधून करिअरला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तीन दशकांच्या कारकिर्दीत, शाहरुख खानने अनेक सिनेमे ब्लॉकब्लस्टर केले आहेत. आणि वयाच्या 58 व्या वर्षीही त्याचे आकर्षण संपलेले नाही. अलीकडेच स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याने आपल्याला किती काळ चित्रपटांमध्ये काम करायचे आहे हे सांगितले आहे.
शाहरुखला किती दिवस काम करायचे आहे?
शाहरुख खान म्हणतो की, ‘त्याला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे आणि शेवटचा वेळ कुठेही नाही तर सेटवर घालवायचा आहे.’ असे अभिनेत्याने सांगितले आहे. पुढे तो म्हणाला, ‘मी नेहमी अभिनय करणार? होय, माझे स्वप्न आहे की मी मरेपर्येंत काम करणार आहे. मी माझा संपूर्ण वेळ सेटवर घालवल्यामुळे मला शेवटचा श्वासही सेटवर घेयायचा आहे.’ असे अभिनेत्याने सांगितले.
शाहरुख खान स्वतःला गंभीर अभिनेता मानत नाही
शाहरुख खानने सांगितले की तो लोकांचे मनोरंजन करण्यासाठी काम करतो. तो स्वत:ला सिरिअस अभिनेता मानत नाही, पण लोकांचे मनोरंजन करण्यासाठी त्याने स्वतःमध्ये काही गोष्टी शोधून काढल्या आहेत. असे त्याने सांगितले आहे. अभिनेता याबाबत म्हणाला की, ‘मी म्हटल्याप्रमाणे मी फार गंभीर अभिनेता नाही आणि लोकांना दाखवण्यासाठी मी अभिनयाविषयी काही आश्चर्यकारक आणि आंतरिक गोष्टी शोधल्या आहेत. आयुष्यातील आनंद मी माझ्या अभिनयातून साजरा करतो.’ असे त्याचे म्हणणे आहे.
हे देखील वाचा – मृत्यूच्या दारातून परतला YouTuber अरमान मलिक? शेअर केला व्हिडीओ म्हणाला ‘मरता मरता…’
शाहरुख खानचे आगामी चित्रपट
2023 मध्ये पठाण, जवान आणि डंकी यांच्यासोबत स्प्लॅश केल्यानंतर, हे वर्ष शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब ठरली आहे. या अभिनेत्याचा 2024 मध्येच नाही तर 2025 मध्येही चित्रपट येणार नाही. तथापि, शाहरुख खानचा पुढचा चित्रपट किंग 2026 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच त्याची मुलगी सुहाना खानसोबत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुखची अनोखी भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.