फोटो सौजन्य - Jio Cinema
बिग बॉस मराठी सिझन ५ – बिग बॉस मराठी सिझन ५ च्या फिनालेचे आयोजन ६ ऑक्टोंबर रोजी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वचजण हा सिझन विजेता कोण असणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या आठवड्यामध्ये स्पर्धकांच्या बाहेरच्या घरातील नाती आली होती. त्यामुळे घरात अनेक नाती पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरामध्ये आई आणि मुलाचं नातं पाहायला मिळालं, जान्हवीचा मुलगा घरामध्ये आला होता. तर बाप लेकींच नातं घरामध्ये दिसलं अभिजित सावंत आणि पंढरीनाथ कांबळे यांच्या मुलींचं गोड बॅान्ड पाहायला मिळाला. त्याचबरोबर बहिणींचं प्रेम देखील पाहायला मिळालं, अंकिता वालावलकर आणि वर्षा उसगावकर यांच्या बहिणी घरामध्ये आल्या होत्या.
आता बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसमधीलच एक जुन नातं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच निक्की तांबोळी आणि राखी सावंत यांचं… बिग बॉसच्या हिंदी शोमध्ये राखी सावंत आणि निक्की तांबोळी या दोघी एकमेकांशी भिडल्या होत्या. आता पुन्हा मराठी बिग बॉसमध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. राखी सावंतने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंन्ट्री केली आहे, यावेळी तिने एंन्ट्री करताच प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सुरुवात केली आहे. यावेळी राखी निक्की सावंतला सस्ती राखी सावंत म्हणाली आहे. या दोघींमध्ये बिग बॉसच्या घरात काय राडा होईल हे पाहणं मनोरंजक ठरेल.
सोमवारपासून या सिझनचा शेवटचा आठवडा सुरू होणार आहे, त्याबरोबर त्या शेवटच्या आठवड्यात बिग बॉसने घरातील सगळ्या स्पर्धकांना नोमिनेट केले आहेत त्यामुळे या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या घरामध्ये आतापर्यत पंढरीनाथ कांबळे, अभिजित सांवत, निक्की तांबोळी, धनजय पोवार, अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, सुरज सांवत आणि जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक अजुनही घरामध्ये शिल्लक आहेत.