Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

सध्या I Popstar ची प्रचंड क्रेझ आहे. मराठमोळ्या रोहित राऊत आणि राधिका भिडेने या शो मधून आपला ठसा उमटवला आहे आणि या कार्यक्रमात पहिलावहिला इंडियन आयडल अभिजित सावंतदेखील गाताना दिसणार आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 18, 2025 | 10:13 PM
अभिजित सावंतच्या आवाजाची पुन्हा एकदा जादू

अभिजित सावंतच्या आवाजाची पुन्हा एकदा जादू

Follow Us
Close
Follow Us:
  • I Popstar मध्ये अभिजित सावंतची जादू 
  • GenZ शो साठी ‘मोहब्बतें’ चा एक नवीन ट्विस्ट 
  • अभिजित सावंतची कमाल
सध्या सोशल मीडिया वर चर्चेत असलेला गाण्याचा अग्रगण्य शो आय पॉपस्टार! राधिका भिडे, रोहित राऊत यांच्यासारख्या मराठमोळ्या गायकांच्या सोबतीने अनेक दर्जेदार गायकांची जुगलबंदी या कार्यक्रमात अनुभवयाला मिळते आहे आणि कमालीची क्रेझ तरूणाईमध्ये दिसून येत आहे. इतकंच नाही तर या शो ची प्रचंड चर्चाही दिसून येत आहे. या शोच्या प्री फिनालेसाठी गायक अभिजीत सावंतदेखील या कार्यक्रमाचा भाग होताना दिसला आहे. 

एव्हरग्रीन ट्रेंडसेटर गायक म्हणून ज्याने संपूर्ण जगाला अभिजितच्या आवाजाने वेड लावलं आणि आजही त्याची गाणी तितकीच क्रेझी ठरतात. गेले अनेक वर्ष मनावर राज्य करणाऱ्या अभिजितनेही या शो मध्ये कमालीची रंगत आणली आहे. इंडियन आयडॉलचा पहिला विजेता ठरलेल्या अभिजीत ने आय पॉपस्टारमध्ये त्याच्या ” मोहब्बते लुटाऊंगा ” सारख्या सदाबहार गाण्याने प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोहीत केलं आहे. 

‘मोहब्बते लुटाऊंगा’ पुन्हा ट्रेंड

सोशल मीडिया वर अभिजीतच मोहब्बत लुटाऊंगा गाणं पुन्हा एकदा ट्रेंड करताना दिसतय. आय पॉपस्टार मधला अभिजीतचा या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होत असून प्रेक्षकांच्या कॉमेंट्स ने देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

कोण आहे Radhika Bhide? जिचा नावाचा हिंदी रिॲलिटी शोमध्ये डंका, एका व्हायरल गाण्यामुळे वाढले फॉलोअर्स

काय म्हणाला अभिजित

आय पॉपस्टारच्या प्री फिनाले बद्दल बोलताना अभिजीत सांगतो ” आय पॉपस्टार सारख्या शोमध्ये पाहुणा गायक म्हणून जाण्याची संधी मला मिळाली आणि हा एक संपूर्ण अनुभव सुंदर सोहळा होता एक कमाल अनुभूती देऊन जाणारा हा शाळा अनुभव होता. आय पॉपस्टारसारखा शो आताच्या काळात मूळ संगीताला प्रोत्साहन देणारा एक म्युज़िकल कॉम्पिटिशन शो असून अनेक प्रतिभावान तरुण म्युझिशन्स (फक्त सिंगर्स नाही) पाहून मला खूप आनंद झाला. त्यांचं गीतलेखन, गाण्यांची प्रेझेंटेशन, म्युझिक सगळंच खूप अप्रतिम होत. 

इंडी म्युझिकचे मोठे स्टार्स असलेले माझे कलाकार गायक मित्र पर्मिश, आदित्य, किंग आणि आस्था त्यांना मेंटर म्हणून साथ देत आहेत हीदेखील मोठी गोष्ट आहे. इंडियन आयडॉल नंतर मला कायम अशा स्टेजवर उभं रहायचं होतं जे आजच्या ओरिजिनल म्युझिकला प्रेक्षकांसमोर घेऊन येतं राहतील आणि आय पॉपस्टार हे काम उत्तमरीत्या करत आहे. या निमित्तानं मला ‘मोहब्बतें लुटाऊंगा’ पुन्हा एकदा परफॉर्म करण्याची संधीही मिळाली पण यावेळी एक ट्विस्ट होता कारण हा GenZ शो असल्यामुळे मी ‘मोहब्बतें’चा एक नवीन, वेगळा व्हर्जन तयार करून सदर केलं आणि ते व्हायरलही झालं” 

२० वर्षानंतरही गाण्याची जादू

२०२५ या वर्षात अभिजीत सावंत गायन इंडस्ट्रीत २० वर्ष पूर्ण करत असताना त्याचा क्लासिक ओल्ड गाण्याचं हे ट्विस्ट असलेलं मोहब्बतें प्रेक्षकांना अनुभवता आलं याहून मोठी गोष्ट काय असणार ! येणाऱ्या काळात अभिजीत अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स करणार असून लवकरच तो एका नव्या कोऱ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

गायक अभिजीत सावंतची भाऊबीज! बहिणीसोबतचे शेअर केले सोनेरी क्षण

Web Title: First indian idol abhijeet sawant will perform in i popstar pre finale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 10:13 PM

Topics:  

  • abhijeet sawant
  • entertainment
  • Entertainment News

संबंधित बातम्या

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
1

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज
2

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज
3

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज

Tom Cruise: अखेर ४५ वर्षांची संपली प्रतीक्षा, अभिनेता टॉम क्रूझला मिळाला पहिला ऑस्कर अवॉर्ड
4

Tom Cruise: अखेर ४५ वर्षांची संपली प्रतीक्षा, अभिनेता टॉम क्रूझला मिळाला पहिला ऑस्कर अवॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.