(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियासह माध्यमांमध्येही सर्वत्र आमिरची जोरदार चर्चा सुरू आहे. कायमच आपल्या वाढदिवसामुळे चर्चेत राहणारा आमिर खान त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आला आहे. लवकरच आमिर तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच आमिरचा ६० वा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीवेळी अभिनेत्याने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडबद्दल खुलासा केला. सध्या लव्हलाईफमुळे चर्चेत असलेल्या आमिर खानने इन्स्टंट बॉलिवूडला मुलाखत दिली आहे.
आमिर खानचे आजवर दोन घटस्फोट झाले आहेत. त्याने पहिलं लग्न रीना दत्तासोबत केलं असून दुसरं लग्न किरण रावसोबत केलं होतं. त्या दोघींसोबतही त्याचं घटस्फोट झालं आहे. आता तो त्याची तिसरी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. लव्हलाईफमुळे चर्चेत असलेल्या आमिर खानने मुलाखतीत तो त्याच्या पहिल्या लग्नाच्या घटस्फोटानंतर खूप दारू पिऊ लागला होता, असा खुलासा केला आहे. घटस्फोट झाल्यानंतरच्या दीड वर्षात अभिनेत्याचं त्याच्या कामावरून पुर्णपणे दुर्लक्ष झालं होतं. दररोज रात्री मद्यपान करायचा असं त्याने मुलाखतीत सांगितलं.
इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत आमिर म्हणाला की, “मी आणि रीना जेव्हा २००२ मध्ये वेगळे झालो तेव्हा जवळपास २ ते ३ वर्षे मी तणावात होतो. मी काम करत नव्हतो, कोणत्याही स्क्रिप्ट ऐकल्या नव्हत्या. घरी एकटाच असल्याने त्या काळात दररोज रात्री खूप दारू प्यायचो. जवळपास, दीड वर्षे मी एकटा राहिलो, तुम्हाला आज ऐकून धक्का बसेल पण, एका दिवसात मी एक बाटली दारू पिऊ लागलो होतो. त्यापूर्वी मी अजिबात दारू पित नव्हतो. मी अगदी ‘देवदास’सारखा वागत होतो, जो स्वत:लाच नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा प्रचंड नैराश्य आलं होतं.”
अवनीत कौरला वयाच्या ११व्या वर्षी दिग्दर्शकाने सेटवर केलेली शिवीगाळ, प्रसंग सांगत म्हणाली…
“आपल्या केलेल्या चुकांना आपल्यालाच स्वत:ला सामोरं जावं लागतं. एकेकाळी जे आपले खास होते ते आता आपले राहिले नाहीत, हे वास्तव स्वीकारावं लागतं. जेव्हा ती माणसं तुमच्याबरोबर होती तेव्हा किती चांगली होती हे देखील स्वीकारलं पाहिजे.” असं आमिरने यावेळी सांगितलं. आमिर खानने सांगितले की त्याने आता दारू पिणे बंद केले आहे. अभिनेता मुलाखतीत इतकंही म्हणाला की, लोकांनी स्वत:चे नुकसान सहन करावे आणि वास्तव स्वीकारावे. आमिर पुढे म्हणाला की, “जे पूर्वी आपले होते ते आता आपले राहिलेले नाही हे स्वीकारा. तुमच्यासोबत असताना तो तुमच्यासाठी किती चांगला होता आणि जेव्हा तो तुमच्यासोबत नसतो तेव्हा तुम्हाला त्याची किती आठवण येते याकडेही व्यवस्थित लक्ष द्या.”
आमिरचं पहिलं लग्न १९८६ मध्ये रीना दत्ताशी झालं होतं. लग्नानंतर जवळपास १६ वर्षांनी म्हणजेच २००२ मध्ये आमिर आणि रीना यांचा घटस्फोट झाला होता. आमिरने बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान पक्क करत असताना रीनाबरोबर गुपचूप लग्न केलं होतं. या जोडप्याने एकत्र १६ वर्षे संसार केला. त्यांना जुनैद आणि आयरा अशी दोन मुलं आहेत. २००२ मध्ये रीनाशी घटस्फोट घेतल्यानंतर आमिरने २००५ मध्ये किरण रावशी लग्न केलं. आमिर आणि किरण रावचाही २०२१ मध्ये घटस्फोट झाला. अलीकडेच त्याच्या ६० व्या वाढदिवशी, आमिरने त्याची नवीन जोडीदार गौरी स्प्रॅटशी मीडियाला ओळख करून दिली.