Rhea Chakraborty’s lawyer says grateful to CBI for closing Sushant Singh Rajput death case
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयकडून (Central Bureau of Investigation- केंद्रीय अन्वेषण विभाग) क्लोजर रिपोर्ट अर्थात अंतिम अहवाल न्यायालयात सादर केला आहे. या अहवालात रिया चक्रवर्तीला क्लिन चिट देण्यात आली आहे. याबाबत आता रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Kangana Ranaut Birthday : ३९ वर्षीय कंगना रणौत अजूनही का आहे सिंगल, स्वत:च केला खुलासा
“सीबीआयच्या अंतिम अहवालात रिया चक्रवर्तीला (Reha Chakraborty) क्लिन चिट देण्यात आली आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. सुशांतच्या मृत्यूच्या सहा दिवस आधीच त्याच्या घरातून ती निघून गेली होती. त्यानंतर पुढचे सहा दिवस ती त्याच्या संपर्कातही नव्हती. मला माहीत नाही, रियाला सुशांतच्या मृत्यूप्रकरणात कोणत्या आधारावर खेचण्यात आलं. मी सुरुवातीपासूनच सांगत होतो की, रिया निर्दोष आहे. तिला या प्रकरणात खूप त्रास सहन करावा लागला. पण रिया एखाद्या वाघिणीसारखी लढली. लोकांनी जे नरेटिव्ह पसरवलं आणि चालवलं ते पूर्णपणे चुकीचं होतं हे सीबीआयच्या अहवालाने सिद्ध केलं आहे.”
“मी तिला सॅल्युट करतो. सोशल मीडिया आणि माध्यमांनी तिच्याबाबत अनेक खोट्या बातम्या प्रसारित केल्या. तिला त्या खोट्या बातम्यांचा प्रचंड त्रास झाला पण तो तिने सहन केले. शेवटी सत्याचा विजय होईल हे मी तेव्हाही म्हटलं होतं आणि आता आजही म्हणतो की सत्याचा विजय होतोच. शेवटी असंच झालं, आताही मला हेच वाटतंय की सत्याचाच विजय झाला. प्रकरणाच्या प्रत्येक पैलूची सर्व बाजूंनी सखोल चौकशी करून प्रकरण बंद केल्याबद्दल आम्ही सीबीआयचे आभारी आहोत.” असं सतीश मानेशिंदे यांनी माध्यमांसोबत बोलत असताना म्हटलं आहे.
अभिनेत्याच्या मृत्यूला जबाबदार कोण? सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयचे मोठे विधान!
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जून २०२० ला त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येची बातमी माध्यमांवर वाऱ्यासारखी पसरली होती. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमागे काही गोष्टींचा संशय असल्यामुळे अभिनेत्याचं मृत्यूप्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. आता सीबीआयने या प्रकरणात जो अंतिम अहवाल सादर केला आहे, त्यात सुशांतच्या मृत्यूचं कारण आत्महत्या आहे असंच नमूद करण्यात आलं आहे.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीत रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह इतर अनेक आरोपींना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने अटक केली होती. ते दोघेही अनेक दिवस तुरुंगात होते. सुशांत सिंगचे वडील के के सिंग यांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी कोणताही कट कारस्थान नसल्याचा दावा सीबीआयने केला असून रिया चक्रवर्तीसह इतर आरोपींना क्लिन चिट दिली आहे.
सीबीआय चौकशीने बसला धक्का… आता काय करणार सुशांतचे कुटूंब ? वडिलांनी लेकासाठी निवडला ‘हा’ मार्ग!