Actress Avneet Kaur Faced Verbal Abuse From Director At Age Of 11
२३ वर्षीय अवनीत कौरने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. बालपणापासून अभिनयामुळे चर्चेत राहिलेली अवनीत सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या करियरच्या यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या वाईट अनुभवावर तिने भाष्य केले. नुकत्याच एका मुलाखतीमधून अवनीतने आजवरच्या करिअरमध्ये घडलेल्या वाईट प्रसंगावर भाष्य केले.
‘टिकू वेड्स शेरू’ चित्रपटामध्ये नवाझुद्दीन सिद्दिकीसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री अवनीत कौर हिने ‘हाउटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत आजवरच्या करिअरमध्ये घडलेल्या वाईट प्रसंगावर भाष्य केले. यावेळी अवनीतने तिच्यासोबत घडलेला वाईट प्रसंग सांगताना, ती म्हणाली की, “मी आठ वर्षांची होती, त्यावेळी एका व्यक्तीने माझ्या चुकीच्या ठिकाणी विचित्र पद्धतीने स्पर्श केला होता. डान्स रिहर्सल करत असताना एक व्यक्ती सतत माझ्या वेगवेगळ्या ठिकाणी तो स्पर्श करत होता. तेव्हा मी या घटनेबद्दल माझ्या आईला सांगितलं. त्यावेळी मला आईने वाईट स्पर्श आणि चांगला स्पर्श याबाबतचा अर्थ समजावून सांगितला. तेव्हापासून मी त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या.”
Kangana Ranaut Birthday : ३९ वर्षीय कंगना रणौत अजूनही का आहे सिंगल, स्वत:च केला खुलासा
आणखी एक किस्सा अभिनेत्रीने सांगितला की, “मी ११- १२ वर्षांची होते. तेव्हा माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने वाईट वर्तन केले होते. त्याने माझ्यासोबत सेटवर गैरवर्तन केले होते. त्यामुळे मी खूप घाबरले होते. त्या दरम्यान माझ्या फिल्मी करियरला नुकतीच सुरुवात झाली होती. एका सिनेदिग्दर्शकाने मला भली मोठी आणि जड शब्द असलेली मोनोलॉगची स्क्रिप्ट दिली होती आणि मला ते डायलॉग म्हणून बोलायचे होते. त्यावेळी मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीनच असल्यामुळे मी दोन- तीन वेळा चुकले होते. त्यांनी माझा माईक सुरु केला आणि मला बोलायला लावलं. मी खूप अडखळत बोलत होती. हे पाहून दिग्दर्शक भडकला.” दरम्यान शिवालीने किस्सा सांगताना दिग्दर्शकांचे नाव सांगितले नाही.
चुम दरांग नाही करत आहे करणवीरला डेट? अभिनेत्याच्या प्रेमाच्या कबुलीनंतर अभिनेत्रीने दिले मोठे विधान
पुढे शिवालीने सांगितले की, “तो मला म्हणाला की, तू कोणतेही काम करण्यासाठी सक्षम नाही आणि इंडस्ट्रीत मी कधीही यशस्वी होणार नाही. त्यानंतर त्या दिग्दर्शकानं मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. शुटिंगवेळी त्याने माझ्या आई-वडिलांना सेटवर येण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळेच हा किस्सा माझ्यासोबत घडला होता. जेव्हा मी हा किस्सा आई-वडिलांना सांगितला. त्यावेळी मी खूप खचले होते. पण, त्या दिग्दर्शकाने असं गैरवर्तन अजून एका अभिनेत्रीसोबत केलं होतं, हे मला पुढे जाऊन कळालं.”