(फोटो सौजन्य - अकाउंट)
सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज दुपारी ४ वाजता प्रदर्शित होणार आहे, पण त्याआधी सिकंदरच्या अॅडव्हान्स बुकिंगबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जी ऐकून चाहत्यांना नक्कीच आनंद होणार आहे. तसेच चाहते या बातमीची वाटच पाहत होते.
अवनीत कौरला वयाच्या ११व्या वर्षी दिग्दर्शकाने सेटवर केलेली शिवीगाळ, प्रसंग सांगत म्हणाली…
आज एका कार्यक्रमादरम्यान ‘सिकंदर’चा ट्रेलर रिलीज होणार आहे. सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन एआर मुरुगादोस यांनी केले आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना पहिल्यांदाच सलमान खानसोबत दिसणार आहे. जिला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकतेच निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्याआधी एक नवे पोस्टर शेअर केले ज्यामध्ये चित्रपटामधील सर्व कलाकार दिसत आहेत. आणि आता चित्रपटाचे ट्रेलर रिलीज होण्याआधी अॅडव्हान्स बुकिंगबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
सिकंदर ३० मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आज दुपारी ४ वाजता प्रदर्शित होणार आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सल्लू भाईच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. १२३ डॉट कॉमच्या मते, सिकंदरची अॅडव्हान्स बुकिंग २५ मार्च २०२५ पासून सुरू होणार आहे. चाहत्यांना चित्रपट पाहण्यासाठी २५ मार्च २०२५ रोजी अॅडव्हान्स बुकिंग करता येणार आहे.
‘सिकंदर’ची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांच्या प्रॉडक्शन बॅनरखाली झाली आहे. या चित्रपटापूर्वी सलमान खान आणि रश्मिकाची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. या चित्रपटात सत्यराजने खलनायकाची भूमिका साकारली होती. चित्रपटाचे संगीत प्रीतम यांनी दिले आहे. ‘सिकंदर’ चित्रपटातील बहुतेक दृश्ये हैदराबाद आणि मुंबईत चित्रित झाली आहेत. सिकंदरच्या ट्रेलर रिलीजपूर्वी, निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर देखील रिलीज केले आहे, ज्यामध्ये ट्रेलर लाँच इव्हेंटची माहिती देण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये लिहिले आहे की आज दुपारी ४ वाजता ट्रेलर प्रदर्शित होईल. या पोस्टसोबत त्यांनी लिहिले, “आता आपण मागे वळूया, तुमचे हृदय धरा आणि घट्ट बसा… फक्त काही तासांतच”. असे लिहून पोस्टर शेअर केले आहे.