(फोटो सौजन्य - x अकाउंट)
सुपरस्टार सलमान खानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपट ‘सिकंदर’च्या ट्रेलरच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित या चित्रपटाच्या निर्मात्यांनी रविवारी, ट्रेलर लाँचच्या काही तास आधी, त्याचे नवीन पोस्टर रिलीज केले. पहिल्यांदाच ‘सिकंदर’ चित्रपटाचे संपूर्ण कलाकार चित्रपटाच्या पोस्टरवर दिसले आहे. त्यांना पाहून चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे जो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज
नवीन पोस्टरमध्ये सलमान खान, रश्मिका मंदान्ना, प्रतीक बब्बर, सत्यराज, काजल अग्रवाल, अंजिनी धवन आणि शर्मन जोशी हे कलाकार दिसत आहेत. निर्मात्यांनी पोस्टर्सद्वारे संपूर्ण कलाकारांची ओळख उघड करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नाडियाडवाला ग्रैंडसनने इंस्टाग्राम हँडलवर अधिकृत पोस्टर शेअर करण्यात आला आहे. चाहत्यांना हा पोस्टर पाहून चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता वाटत आहे.
अवनीत कौरला वयाच्या ११व्या वर्षी दिग्दर्शकाने सेटवर केलेली शिवीगाळ, प्रसंग सांगत म्हणाली…
आज रिलीज होणार ट्रेलर
निर्मात्याने पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये चित्रपटाच्या ट्रेलर लाँचची माहितीही शेअर केली. निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आता मला मागे वळायला भीती वाटते.’ मी माझे हृदय हातात घेऊन बसलो आहे. फक्त काही तास उरले आहेत. ‘सिकंदर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर आज रविवार, २३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता मुंबईत एका भव्य कार्यक्रमात लाँच होणार आहे.’ असे लिहून चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. जे पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. कारण या पोस्टरमध्ये कलाकारांची झलक पाहायला मिळाली आहे.
चुम दरांग नाही करत आहे करणवीरला डेट? अभिनेत्याच्या प्रेमाच्या कबुलीनंतर अभिनेत्रीने दिले मोठे विधान
या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
सलमान खान आणि एआर मुरुगदास यांनी ‘सिकंदर’ चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. सलमानने पुन्हा एकदा त्याचा ‘किक’ दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांच्याशी हातमिळवणी केली आहे. सलमानसोबत रश्मिकाचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्याचे चित्रीकरण हैदराबाद आणि मुंबईत झाले आहे. ‘सिकंदर’ ३० मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.