रवि किशन यांना मुलीला सैन्यात का पाठवायचे नव्हते, कशी झाली 'अग्निवीर' योजनेत सहभागी ? अभिनेत्याने केला खुलासा
भोजपुरी सिनेविश्व गाजवणारे अभिनेते रवी किशन यांना बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश मिळाले नाही. मात्र भोजपुरी इंडस्ट्री गाजवत हा अभिनेता सुपरस्टार ठरला. त्यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये ७०० हून अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेले अनेक दशके ते इंडस्ट्रीत सक्रिय असून हिंदी चित्रपटांपासून ते टीव्ही आणि भोजपुरी इंडस्ट्रीपर्यंत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. अभिनेता असण्यासोबतच रवी किशन राजकीय नेतेही आहे. सध्या अभिनेता उत्तरप्रदेशच्या गोरखपूर मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत.
प्राजक्ता माळीला नवोदित कवयित्री पुरस्काराने सन्मानित, पोस्ट शेअर करत म्हणाली…
अभिनेता आणि खासदार रवी किशन यांची मुलगी इशिता अग्निवीर योजनेंतर्गत संरक्षण दलात सहभागी झाली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवी किशन यांनी त्यांच्या मुलीने अग्निवीर योजनेत सहभागी होण्याच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये बोलत असताना, रवी किशनने मुलगी इशिता आर्मीमध्ये का गेली ? या प्रश्नावर भाष्य केले. राजकारण्यांवर अनेकदा आपल्या मुलांना सैन्यात न पाठवल्याचा आरोप केला जातो, मग तुम्ही आपल्या मुलीला सैन्यात कसे पाठवले? यावर अभिनेता रवी किशनने आपले मत मांडले आहे.
“बॉलिवूडवाले अनाथ म्हणूनच…”, कंगनाने रनौतची बॉलिवूड विरोधात पुन्हा वादग्रस्त विधान
शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत अभिनेता रवी किशन म्हणाला की, “मी पण माझ्या मुलीला आर्मीमध्ये नोकरी करण्यासाठी पाठवू इच्छित नव्हतो, मी खोटं बोलत नाही. आपल्या मुलाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होईल, असं कोणाच्याही आई- वडिलांना वाटत नाही. कारण की, आर्मीचं ट्रेनिंग खरोखर खूप कठीण असतं. आपल्या मुलीवर सर्वच प्रेम करतात. आईच्या जवळ मुलगा असतो, तर वडिलांच्या जवळ मुलगी असते. आर्मीमध्ये जाण्याचा निर्णय माझ्या मुलीचा स्वतःचा निर्णय होता.”
फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड कलाकारांची हजेरी; मात्र रणबीर-आलियाने वेधले लक्ष!
रवी किशनने मुलीला रोखण्याचा प्रयत्न का केला नाही या प्रश्नावर अभिनेता म्हणाला, “तिला मी म्हणालो होतो की, तुला हेच का करायचे? हे खूप कठीण आहे, त्याचा व्यवस्थित विचार कर. तू एनसीसी कॅडेट होशील, तीन वर्षे दिल्लीत राहशील आणि त्यानंतर स्नायपर होणार असा हा प्रवास असणार आहे.” मुलाखतीमध्ये पुढे अभिनेता म्हणाला, “हे दिसतं तितकं सोप्प नाही. तिने २६ जानेवारीच्या दिवशी दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या समोर परेड सुद्धा केला आहे. मी जेव्हा तिला विचारलं की तुला सैन्य दलात का जायचंय? त्यावर उत्तर देताना ती मला म्हणाली, “तुम्ही पांढरा कुर्ता परिधान करून संसदेत का जाता?” तिचं हे उत्तर ऐकून मी शांत झालो.”
लग्नाच्या १२ वर्षांनंतर राधिका आपटे बनली आई, बाळाला दूध पाजतानाचा फोटो केला शेअर
रवी किशन यांनी पुढे त्यांच्या एका मुलाबद्दलही सांगितले, त्यांचा एक मुलगा कलाकार आहे तर दुसरी मुलगी शेअर मार्केटचे शिक्षण घेत आहे. त्यांची सर्व मुलं अभ्यासात खूप चांगले हुशार आहेत.