बॉलीवूड इंडस्ट्रीतील शोमॅन म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेते राज कपूर यांची आज १४ डिसेंबर रोजी 100 वी जयंती आहे. राज कपूर यांच्या या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबीयांनी विशेष तयारी केली आहे. 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत देशातील काही शहरांमध्ये फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले जाणार आहेत, ज्यामध्ये राज कपूर यांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत. कपूर कुटुंबाव्यतिरिक्त बॉलिवूडचे सर्व स्टार्स शुक्रवारी संध्याकाळी मुंबईतील फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसले. या कार्यक्रमात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी धुमाकूळ घातला.
फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड कलाकारांची हजेरी; मात्र रणबीर-आलियाने वेधले लक्ष! (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लूकवर लोकांच्या नजरा खिळल्या होत्या. चाहत्यांनी साडीतील आलियाला पसंती दिली तर रणबीरच्या मिशीने त्यांचे लक्ष वेधून घेतले.
करीना कपूर पती सैफ अली खानसोबत दिसली. सैफ आणि बेब्सचे नवाबी स्टाइलचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोघेही या पोशाखात आकर्षित दिसत आहेत.
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा त्यांच्या कुटुंबासह दिसले. त्यांचे जावई शर्मन जोशी यांनी देखील पापाराझींना पोज दिली. संपूर्ण कुटूंब खूप आनंदी दिसले.
राज कपूर यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रपट महोत्सवात कपूर कुटुंब एकाच फ्रेममध्ये दिसले. त्यांना पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला.
आलिया भट्टने वडील महेश भट्टसोबत पोज दिली. त्याचवेळी त्याची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्ट एकत्र दिसल्या. भट्ट कुटूंब देखील एकत्र सुंदर दिसले.
अभिनेता रितेश देशमुख त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझासोबत चित्रपट महोत्सवात पोहोचला. या जोडप्याने अतिशय प्रेमळ पोज दिली.
राज कपूर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनीही हजेरी लावली होती. दोघेही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.