राधिका आपटेला आई व्हायचं नव्हतं, तरीही राहिली प्रेग्नेंट; स्वत:च केला खुलासा
लग्नाच्या १२ वर्षांनंतर अभिनेत्री राधिका आपटे आई झाली आहे. अभिनेत्रीने आठवड्याभरापूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर बाळासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री आपल्या बाळाला ब्रेस्टफीडिंग करताना दिसत आहे. राधिकाने २०१२ मध्ये ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि गायक बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. लग्नाच्या १२ वर्षांनंतर अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना ‘गोड बातमी’ दिली आहे.
अल्लू अर्जुनने घेतली पत्रकार परिषद, म्हणाला- ‘बाहेर जे काही झाले, त्याचा माझ्यासोबत संबंध नाही…’
बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या राधिकाने दोन महिन्यांपूर्वी लंडन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर येत सर्वांना सुख:द धक्का दिला. राधिका तेव्हा गरोदर होती. तिने त्याआधी ही बातमी कुठेच दिली नव्हती. रेड कार्पेटवर येताच तिच्या बेबी बंपमुळे तिच्या गरोदरपणाची बातमी सर्वांना समजली. नुकतंच शेअर केलेल्या पोस्टमध्ये, अभिनेत्रीने आपल्या चिमुकल्याबाळासोबत एक फोटो शेअर केलेला आहे. अभिनेत्री लॅपटॉपवर काम करत असताना बाळाला ब्रेस्टफीडिंग करताना दिसत आहे.
12th Fail अभिनेत्याची रिटायर्डमेंटच्या प्रकरणावर प्रतिक्रिया; म्हणाला, “मी पूर्णपणे थकलोय…”
फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, “बाळाच्या जन्माच्या एका आठवड्यानंतर माझी पहिली वर्क मीटिंग.” सोबतच कॅप्शन दिल्यानंतर अभिनेत्रीने ब्रेस्टफीडिंग, आशीर्वाद, मदर ॲट वर्क, सुंदर चॅप्टर असे हॅशटॅग दिले आहेत. राधिकाचा नवरा बेनेडिक्ट टेलरनेच हा फोटो काढला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड आनंदी दिसत आहे. नेमकं राधिकाने मुलाला जन्म दिला आहे की, मुलीला जन्म दिला आहे, हे अद्याप समजलेलं नाही. राधिकाच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
अभिनेत्रीने वयाच्या ३९व्या वर्षी गोंडस बाळाला जन्म दिलाय. राधिकाने तिच्या गरोदरपणाचा प्रवास शेअर केला होता. यामध्ये तिला आलेल्या अडचणींबद्दलही तिने भाष्य केलं होतं. आता बाळाच्या जन्मानंतर ती पुन्हा नव्या जोमाने कामालाही लागली आहे. राधिकाने ‘फोबिया’, ‘हंटर’, ‘पॅड मॅन’, ‘बदलापूर’, ‘फॉरेन्सिक’, ‘बाजार’, ‘विक्रम वेधा’, ‘कबाली’, ‘अंधाधुंद’, ‘द वेडिंग गेस्ट’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘मेरी ख्रिसमस’, ‘लय भारी’, ‘तुकाराम’, ‘शोर इन द सिटी’, ‘वेत्री सेलवन’, ‘मांझी द माऊंटन मॅन’ यांसारख्या अनेक मराठी, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
हाती राम चौधरीचे पुनरागमन, पोस्टरमध्ये जयदीप अहलावतचा जबरदस्त अंदाज!