प्राजक्ता माळीला नवोदित कवयित्री पुरस्काराने सन्मानित, पोस्ट शेअर करत म्हणाली...
अभिनेत्री, निर्माती, नृत्यांगना, कवियित्री, होस्ट आणि बिझनेसवुमन अशा वेगवेगळ्या भूमिका अगदी लिलया पाडणारी व्यक्ती म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. कायमच सौंदर्यामुळे चर्चेत राहणारी प्राजक्ता सध्या तिच्या कतृत्वामुळे चर्चेत आली आहे. बहुआयामी प्राजक्ता माळीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. प्राजक्ता माळीच्या पहिल्यावहिल्या ‘प्राजक्तप्रभा’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून नवोदित कवयित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
लग्नाच्या १२ वर्षांनंतर राधिका आपटे बनली आई, बाळाला दूध पाजतानाचा फोटो केला शेअर
प्राजक्ता माळीला काल अर्थात १३ नोव्हेंबरला नवोदित कवयित्री म्हणून ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’चा ‘सुनीताबाई स्मृती साहित्य पुरस्कार’ने गौरविण्यात आलं आहे. यासंदर्भात अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ‘सुनीताबाई स्मृती साहित्य पुरस्कार’ मिळतानाचा अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केलेला आहे. व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांसोबत कॅप्शनही दिला आहे. ती म्हणते, “पुरस्कार अनेक मिळतात पण साहित्य क्षेत्रातील संस्थांची मातृसंस्था असलेल्या “महाराष्ट्र साहित्य परिषदेचा” पुरस्कार मिळणं; हे माझं अहोभाग्य. “महाराष्ट्र साहित्य परिषद”चा ‘सुनीताबाई स्मृती साहित्य पुरस्कार’नवोदित कवयित्री. स्थळ – माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रोड, पुणे. (याच ठिकाणी प्राजक्तप्रभाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं होतं, पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालं अशा ज्येष्ठ कवी प्रविण दवणे यांच्याच हस्ते पुरस्कार मिळाला. #योगायोग) अभिनेत्री असताना कवयित्री म्हणून सन्मान मिळणं हे दुर्मिळ. पाठीवर शाबासकीची थाप, पुढील लेखनासाठी प्रोत्साहन. मसापचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचे विशेष आभार.”
पीएम मोदींनी राज कपूर यांना 100 व्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली, लिहिली खास नोट!
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा एक उत्तम कवियित्री आहे, हे तिच्या अनेक चाहत्यांना अजूनही ठाऊक नाही. २०२१ साली अभिनेत्रीने तिचा पहिलावहिला कवितासंग्रह प्रकाशित केला होता. तिच्या त्या काव्यसंग्रहाचं नाव ‘प्राजक्तप्रभा’असं आहे. तिच्या ह्याच काव्यसंग्रहाला नवोदित कवी म्हणून ‘सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. अभिनेत्रीच्या ह्या कवितासंग्राहाला पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्यावर अवघ्या महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून गेल्या दोन वर्षांपासून एका नवोदित कवियित्रीला आणि एका ज्येष्ठ कवियित्रीला हा पुरस्कार देण्यात येतो.
12th Fail अभिनेत्याची रिटायर्डमेंटच्या प्रकरणावर प्रतिक्रिया; म्हणाला, “मी पूर्णपणे थकलोय…”
ज्येष्ठ कवयित्री पद्मरेखा धनकर (चंद्रपूर) आणि नवोदित कवयित्री प्राजक्ता माळी (पुणे) यांना “सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कारा”ने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप अनुक्रमे अकरा आणि दहा हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल बोलायचं तर, निर्माती क्षेत्रातील तिच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाची सोशल मीडियासह सर्वत्र ‘फुलवंती’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ११ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ चित्रपटात प्राजक्तासह अभिनेता गश्मीर महाजनी प्रमुख भूमिकेत आहे. शिवाय, प्रसाद ओक, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, क्षितीज दाते, हृषिकेश जोशी, सुखदा खांडकेकर, जयवंत वाडकर, सविता मालपेकर, दीप्ती लेले, सुनिल अभ्यंकर, निखिल राऊत अशी तगडी स्टारकास्ट चित्रपटात आहेत.