Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं; सुपरस्टार अभिनेत्रीच्या मुलाचं खडतर आयुष्य जाणून घ्या…

प्रतिक बब्बरचा आज वाढदिवस असून त्याच्या संघर्षमय जीवनाबाबत काही गोष्टी आज आपण पाहणार आहोत.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 28, 2024 | 07:45 AM
"मी जिथे शिकायला गेलो तिथून हाकललं, कारण…", प्रतीक पाटीलने सांगितली आपबिती; कारण सांगत केला खुलासा

"मी जिथे शिकायला गेलो तिथून हाकललं, कारण…", प्रतीक पाटीलने सांगितली आपबिती; कारण सांगत केला खुलासा

Follow Us
Close
Follow Us:

अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री यांचे मुलं स्टार किड्स म्हणून जन्मताच चर्चेमध्ये असतात. परंतु एक स्टार किड (Star Kid) असा आहे, ज्याने आपल्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना केलाय. त्या अभिनेत्याचं आपल्या परखड आयुष्यात बॉलिवूड सितारा पर्यंतचा प्रवास करणाऱ्या मुलाचं नाव आहे, प्रतिक बब्बर (Prateik Babbar). प्रतिक बब्बर हा सुपरस्टार राज बब्बर (Raj Babbar) आणि स्मिता पाटील (Smita Patil) यांचा मुलगा आहे. प्रतिकचे आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले राहिले. प्रतिकचा आज वाढदिवस असून त्याच्या संघर्षमय जीवनाबाबत काही गोष्टी आज आपण पाहणार आहोत.

आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल पत्नीला माहिती होतं; तरीही विचारला नाही जाब, स्वत:च सांगितलं कारण

बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बरचा जन्म २८ नोव्हेंबर १९८६ रोजी झाला आहे. स्मिता पाटील यांनी त्याला जन्म दिला पण मातृत्वाचे सुख त्यांच्या नशीबी नव्हते. मुलाला जन्म दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच स्मिता पाचील यांचे निधन झाले. स्मिता यांना ब्रेन इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांच्या शरीराच्या अवयवांनी काम करणं बंद केले होतं. आईच्या निधनानंतर, प्रतीक बब्बरचे संगोपन स्मिता यांच्या आई-वडिलांनी केले होते. प्रतीक बब्बरने अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या आयुष्यातील सर्वच चढ-उतारांबद्दल भाष्य केले आहे.

आईच्या निधनानंतर प्रतीकचे संगोपन त्याच्या आजीने केले होते. परंतु एकेकाळी तो आपल्या वडिलांचा द्वेष करायचा. १२ वर्षांचा असतानाच प्रतिकला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं. तो पूर्णपणे ड्रग्जच्या आहारी गेला होता. मात्र, आज प्रतिक त्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडला आहे. प्रतीक एका मुलाखतीत म्हणाला होता की, “माझ्या वडिलांकडे माझं म्हणणं ऐकायला वेळ नव्हता. प्रत्येकजण मला माझ्या आईबद्दलट सांगायचे. पण, मला त्याचा काही फरक पडला नाही. मला नेहमी प्रश्न पडायचा की, माझी आई माझ्यासोबत का नाही?”

नुसरत भरुच्चाच्या ‘छोरी’ चित्रपटाला ३ वर्ष पूर्ण, अभिनेत्रीने चित्रपटाची झलक शेअर करून चाहत्यांना केले चकित!

प्रतीकला वयाच्या १२ व्या वर्षी ड्रग्जचे मोठ्या प्रमाणावर व्यसन होते. ड्रग्जच्या व्यसनाबद्दल बोलताना प्रतीक बब्बरने एका मुलाखतीत सांगितले होते की, ” १२ वर्षांचा असतानाच मला ड्रग्जचं व्यसन लागलं होतं. त्यामुळे एकदा नाही तर दोनदा मला रिहॅब सेंटरमध्ये भरती करण्यात आलं होतं. ड्रग्जच्या व्यसनानेच माझा मृत्यू जवळजवळ झालाच होता. माझ्या आईसारखी असलेली माझी आजी मला ड्रग्जच्या आहारी गेल्याच्या काळजीनेच हे जग सोडून गेली. मात्र, हळूहळू मी ड्रग्जचे जग सोडून सामान्य जीवनात परतलो आणि अनेक बड्या कलाकारांसोबत काम करु लागलो.”

प्रतिकने आपल्या फिल्मी करियरची सुरूवात २००८ मध्ये एका चित्रपटाच्या माध्यमातून केली. या चित्रपटाचे नाव जाने ‘तू या जाने ना’ असं होतं. या चित्रपटात प्रतिकने जेनेलिया डिसोझाच्या भावाची भूमिका साकारली होती. परंतु या चित्रपटातून प्रतिकची फारशी ओळख निर्माण झाली नाही. या चित्रपटानंतर त्याने ‘एक दीवाना था’, ‘धोबी घाट ‘ अशा हीट चित्रपटांमध्ये काम केली. त्याचप्रकारे मुल्क, बागी २ , छिछोरे आणि दरबार अशा चित्रपटांतून प्रतिकने आपल्या स्वत:ची ओळख निर्माण केली.

“प्रसिद्धीसाठी मला कपडे काढण्याची…”, MMS लीक झाल्यानंतर प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीने सोडलं मौनजानेवारी २०१८ मध्ये प्रतिकने त्याची गर्लफ्रेंड सान्या सागरशी साखरपुडा केला होता. त्यानंतर या दोघांचे २०१९ मध्ये लग्न झाले. आता प्रतिक आणि सान्या आनंदाने आपले विवाहित जीवन व्यतीत करित आहेत. त्याचसोबतच प्रतिकने आपल्या वैयक्तिक जीवनात प्रसिद्धीपासून दूर राहणेच पसंत केले आहे.

Web Title: Bollywood legendary actrss smita patil and actor raj babbar son prateik babbar take drugs at age of 13 know his unheard facts on his birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 07:45 AM

Topics:  

  • Bollywood News

संबंधित बातम्या

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद
1

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
2

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!
3

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल
4

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.