आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल पत्नीला माहिती होतं; तरीही विचारला नाही जाब, स्वत:च सांगितलं कारण
झरीना वहाब आणि आदित्य पांचोली यांनी १९८६ साली लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या संसाराला आता जवळपास ४० वर्षे होतील. कायमच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत राहणारे आदित्य पांचोली त्यांच्या खासगी आयुष्यामुळे विशेष चर्चेत राहिले. झरीना वहाब यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर आदित्य पांचोली यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. नुकतंच झरीना वहाब यांनी दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, तिला आदित्यच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सची माहिती होती. मात्र, याबाबत अभिनेत्रीने पतीला मुद्दाम प्रश्न विचारले नाहीत, असं ती म्हणाली आहे.
लेहरेन रेट्रोला दिलेल्या मुलाखतीमध्ये झरीनाने आदित्य पांचोलीच्या अफेअर्सबद्दल भाष्य केलंय. तिने सांगितलं की, “मला नेहमीच आदित्यच्या अफेअर्सबद्दल माहिती होतं, पण मी त्याच्याजवळ केव्हाच कोणतीही चौकशी केली नाही किंवा त्याला कोणतेही मी प्रश्न विचारले नाहीत. घरी असताना तो माझ्याशी कसा वागतो याचीच मला काळजी होती.” झरीनाला आदित्यच्या विवाह बाह्य संबंधांबद्दल माहिती असूनही तिने पतीला कोणतेही प्रश्न का विचारले नाहीत, याबद्दलही अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितले. झरीना म्हणाली, “मी त्याला प्रश्न विचारले नाहीत. कारण, त्यामुळे तो घाबरला नसता. मला त्याच्या अफेअर्सबद्दल सर्व काही माहिती होतं.”
“प्रसिद्धीसाठी मला कपडे काढण्याची…”, MMS लीक झाल्यानंतर प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीने सोडलं मौन
आदित्य पांचोलीचं नाव १९९३ मध्ये कबीर बेदी यांची मुलगी पूजा बेदीसोबत जोडले गेले होते. पण जेव्हा पूजाच्या मोलकरणीने आदित्यवर बलात्काराचा आरोप केला तेव्हा पूजाने त्याच्याविरोधात एफआयआरही दाखल केली होती आणि त्यांचे नाते तिथेच संपले. २००४ मध्ये आदित्य कंगना रणौतला डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. कंगना रणौतनेही आदित्य पांचोलीवर बलात्काराचा आरोप केला होता. या आरोपांबाबतही झरिना वहाबने प्रतिक्रिया दिली, “तो केव्हाच गैरवर्तन करणाऱ्या सारखा नव्हता. तो खूप प्रेमळ आहे. खरंतर, मीच त्याला मारेल. पण, तो खरोखरंच खूप प्रेमळ आहे. त्याच्या गर्लफ्रेंड्सना ज्या गोष्टी हव्या होत्या, त्या गोष्टी न मिळाल्यामुळे त्यांनी त्याच्यावर असे आरोप केले होते.”