"प्रसिद्धीसाठी मला कपडे काढण्याची...", MMS लीक झाल्यानंतर प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्रीने सोडलं मौन
पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ चित्रपटात टॉलिवूड अभिनेत्री दिव्या प्रभा हिने प्रमुख भूमिका साकारली होती. सध्या सोशल मीडियावर चित्रपटातील तिचा एक व्हिडिओ लीक झाल्यामुळे अभिनेत्री चर्चेत राहिली आहे. नुकतेच आता दिव्याने चित्रपटातील व्हिडिओबाबत एका मुलाखतीच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. ज्यांनी चित्रपटातील ‘तो’ व्हिडिओ लीक केला आहे, त्यांच्यावर अभिनेत्रीने संताप व्यक्त केलाय.
“…दोघांचेही आयुष्य मिळते- जुळते”, स्वत किंग खानने केली आपल्या आयुष्याची तुलना ‘मुफासा’सोबत
ऑनमनोरमासोबत संवाद साधताना दिव्या प्रभाने सांगितलं की, “हा खूपच विचित्र प्रकार आहे. जेव्हा मी त्या चित्रपटातील भूमिकेसाठी साइन अप केले होते, तेव्हा मला केरळमधील लोकांच्या गटाकडून अशी प्रतिक्रिया अपेक्षित होती. आम्ही अशा समुदायातून आहोत की, जो यॉर्गोस लॅन्थिमोस सारख्या चित्रपट निर्मात्यांना आणि त्यांच्या चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रींना कामासाठी ऑस्कर दिले जातात. पण मळ्याळी महिलांनी अशा भूमिका केल्या आहेत हे आपण सहन करू शकत नाहीत. मला हे पाहून आनंद झाला की, या कृतीला विरोध करणारे लोकं विशेषत: पुरुष होते.”
पुरुषोत्तम बेर्डे यांना विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’
दिव्या प्रभा पुढे मुलाखतीत म्हणाली की, “यावरून कळतं की, सध्याच्या पिढीमध्ये खूप आशा आहे. लीक झालेला व्हिडिओ शेअर करणाऱ्यांमध्ये 10% लोकसंख्या आहे आणि मला त्यांची मानसिकता समजत नाही. आम्हाला मान्यता देणाऱ्या केंद्रीय मंडळाचा मल्याळी देखील भाग होते. एक कलाकार म्हणून मी अशाच स्क्रिप्ट्स करते ज्यामध्ये मी कम्फर्टेबल आहे. ‘ऑल वुई इमॅजिन एज लाईट’मधील माझ्या पात्रात मी पूर्णपणे कम्फर्टेबल होते. काही लोकांनी माझ्यावर टीका केली आणि म्हटले की मी प्रसिद्धीसाठी अशी सीन्स केली आहेत आणि मी समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटांचा देखील एक भाग आहे. प्रसिद्धीसाठी मला माझे कपडे काढण्याची गरज वाटत नाही.”