Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर ठरलं! विकी कौशलचा बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; ट्रेलरचीही तारीख आली समोर

सर्वत्र उत्सुकता आहे ती अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने विकी कौशलच्या बहुप्रतिक्षित ‘छावा’ चित्रपटाची रिलीज डेट आणि ट्रेलरची रिलीज डेट जाहीर झालीये.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 16, 2025 | 09:41 PM
Chhaava Movie

Chhaava Movie

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सर्वत्र उत्सुकता आहे ती अभिनेता विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटाची. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. खरंतर, हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट आहे. या चित्रपटाचा गेल्या काही दिवसांपूर्वीच टीझर रिलीज करण्यात आला होता. आता लवकरच या चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे. नुकतंच या चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.

हल्लेखोराची सैफच्या मोलकरणीकडे १ कोटी खंडणीची मागणी; FIRमध्ये मोठी अपडेट समोर

विकी कौशलच्या ह्या बहुप्रतिक्षित ‘छावा’ चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होते. यापूर्वी हा चित्रपट डिसेंबर महिन्यात रिलीज होणार होता. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ बरोबर विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपटही क्लॅश होणार होता. मात्र, यानंतर ‘छावा’ चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आली. टीझर आणि पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता प्रेक्षकांना उत्सुकता होती ती ट्रेलरची… अखेर आज छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक समारंभाचं औचित्य साधत चित्रपटाच्या टीमने आमि मॅडॉक फिल्म्सकडून ‘छावा’ची नवीन रिलीज डेट आणि ट्रेलरची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.

 

मॅडॉक फिल्म्सने पोस्ट शेअर करत लिहिलेय की, “छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा १६ जानेवारी १६८१ रोजी पार पडला होता. या दिनाचं औचित्य साधत आज बरोबर ३४४ वर्षांनंतर आम्ही महाराजांची यशोगाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी सज्ज झालो आहोत.” छावा चित्रपटाचा ट्रेलर येत्या २२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं मॅडॉक फिल्म्सने या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. याशिवाय मॅडॉक फिल्म्सने चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटचीही घोषणा केली आहे.

कंगना रणौतच्या Emergency च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी CM देवेंद्र फडणवीसांची हजेरी

बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट पूर्वी ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली होती. अखेर येत्या १४ फेब्रुवारीला विकी कौशलचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक भूमिकेसाठी विकी कौशलने दिवसरात्र मेहनत घेतली होती. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळणं ही अभिनेत्यासाठी मोठी गोष्ट होती. चित्रपटात विकीसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारणार आहे. याशिवाय अनेक मराठी कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर, ‘छावा’मध्ये औरंगजेबच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसेल. तर, चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.

Web Title: Bollywood movie chhaava trailer and release date out vicky kaushal starrer movie based on chhatrapati sambhaji maharaj set to release on feb 14

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 09:41 PM

Topics:  

  • Chhaava
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

कतरिना कैफने स्वतःच केली प्रेग्नंसीची घोषणा, गोड बेबी बंपसोबत शेअर केला फोटो
1

कतरिना कैफने स्वतःच केली प्रेग्नंसीची घोषणा, गोड बेबी बंपसोबत शेअर केला फोटो

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद
2

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

Love And War मध्ये आलिया- रणबीरसोबत विकी कौशलचा काम करण्याचा अनुभव कसा होता? एका वाक्यातच केलं कौतुक…
3

Love And War मध्ये आलिया- रणबीरसोबत विकी कौशलचा काम करण्याचा अनुभव कसा होता? एका वाक्यातच केलं कौतुक…

Vicky Birthday: विकी कौशलच्या वाढदिवसानिमित्त वडील शाम कौशल यांची खास पोस्ट, व्हिडिओ करत म्हणाले…
4

Vicky Birthday: विकी कौशलच्या वाढदिवसानिमित्त वडील शाम कौशल यांची खास पोस्ट, व्हिडिओ करत म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.