हल्लेखोराची सैफच्या मोलकरणीकडे १ कोटी खंडणीची मागणी; FIRमध्ये मोठी अपडेट समोर
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी मध्यरात्री धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. अज्ञाताने अभिनेत्यावर मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेत्यावर हल्लेखोराने ६ वार केले होते. त्यातील २ वार अत्यंत खोलवर आणि तर बाकीच्या जखमाही किरकोळ आहेत. त्यानंतर अभिनेत्याला मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या हल्लाप्रकरणात आता नवीन अपडेट समोर आली आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने खंडणी मागितली आहे. सैफच्या घरी काम करणाऱ्या महिलेने एफआयआरमध्ये दिलेल्या जबाबात याचा उल्लेख करण्यात आला आहे.
कंगना रणौतच्या Emergency च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी CM देवेंद्र फडणवीसांची हजेरी
सैफच्या घरी काम करणाऱ्या महिलेने एफआयआरमध्ये दिलेल्या जबाबावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सैफ- करीनाचा मुलगा जहांगीरची नर्स एलियामा हिने पोलिसांना आज जबाब दिला. तिने एफआयआरमध्ये दिलेल्या जबाबानुसार, जेव्हा घरातले सर्व सदस्य झोपायला चालले होते, त्यावेळी तिला एक सावली दिसली. टोपी घातलेल्या व्यक्तीची सावली तिला दिसली होती. ती त्या सावलीजवळ गेली आणि तितक्यात तिला घरात हल्लेखोर दिसला. हल्लेखोराने एलियामाला पाहिल्यानंतर त्याने तोंडावर बोट ठेवून तिला शांत राहण्याचा इशारा केला. पण, महिलेने त्याला हिंदीमध्ये आप कौन है? आपको क्या चाहिये? असा प्रश्न विचारला.
Sanjay Raut : ‘सैफ अली खान मोदींच्या भेटीसाठी गेला होता म्हणून…’; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
त्यावर हल्लेखोराने कोणीही घरातून बाहेर जाणार नाही, सगळे आतच थांबतील अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा एकदा त्या नर्सने हल्लेखोराला आपको क्या चाहिये असा पुन्हा सवाल विचारला, त्यावेळी त्याने पैसे चाहिये असं उत्तर दिलं. महिलेने त्याला तुला किती पैसे हवेत ? असाही सवाल केला. त्या प्रश्नावर हल्लेखोराने एक कोटी रुपये हवे असल्याचं सांगितलं. पैशांची मागणी केल्यानंतर हल्लेखोर आणि सैफ अली खानच्या घरातल्या काम करणाऱ्या महिला यांच्यात भांडण सुरू झालं. त्यानंतर आरोपीने त्याच्या हातात असलेल्या धारदार शस्त्राने सैफ अली खानवर हल्ला केला. हे धारदार शस्त्र एक्सो ब्लेड असल्याची माहिती मिळत आहे. तसंच यात सैफच्या घरात काम करणाऱ्या दोन्ही महिला नर्स जखमी झाल्या असल्याची माहिती मिळत आहे.
सैफ आणि करीना कुटुंबासोबत इमारतीतील ११व्या आणि १२व्या मजल्यावर राहतात. घरात एकूण ९ महिला कामासाठी आहेत. त्यापैकी तीन महिला टेरेसवर होत्या, तर सैफच्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या महिला ११व्या मजल्यावर होत्या. नर्सने दिलेल्या माहितीनुसार, सैफचा मुलगा जहांगीरच्या बाथरुममध्ये हल्लेखोर लपून बसला होता, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे.