(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. आता खुद्द आमिर खानने ‘सितारा जमीन पर’च्या रिलीज डेटची पुष्टी केली आहे. त्यानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये कधी प्रदर्शित होणार हे ठरवण्यात आले आहे. आमिर खानने चित्रपटाची नवी कथा काय असेल हे देखील सांगितले आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल असे अभिनेत्याचे मत आहे.
आमिरने चित्रपटाची रिलीज डेट केली जाहीर
अलीकडेच, पिंकव्हिलाशी झालेल्या संभाषणादरम्यान, आमिरने ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाबद्दल सांगितले. यादरम्यान, आमिरने पुष्टी केली की ‘सितारे जमीन पर’ २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या मुख्य थीमबद्दल बोलताना आमिर म्हणाला की हा चित्रपट अनेक प्रकारे मानसिक आरोग्याबद्दल आहे. आमिरच्या या खुलाशानंतर, चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘काश्मीर आमचं आहे…’, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर रितेश देशमुखने पाकिस्तानवर व्यक्त केला संताप!
‘सितार जमीन पर’ हा ‘तारे जमीन पर’चा सिक्वेल असेल
आर.एस. प्रसन्ना दिग्दर्शित हा चित्रपट २००७ मध्ये आमिर खान दिग्दर्शित ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा सिक्वेल असल्याचे म्हटले जात आहे. ‘तारे जमीन पर’ मध्ये डिस्लेक्सियाने ग्रस्त असलेल्या मुलाचा संघर्ष संवेदनशीलपणे चित्रित करण्यात आला होता. आमिरच्या प्रभावी सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या या नवीन प्रकल्पाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट आता येत्या २० जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
आमिरसोबत दिसणार जेनेलिया
या चित्रपटात आमिर खान ‘तारे जमीन पर’ अभिनेता दर्शील सफारीसोबत पुन्हा दिसणार आहे. तसेच, जेनेलिया देशमुख ही चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे, ‘सितारा जमीन पर’ हा चित्रपट २०१८ च्या हिट स्पॅनिश चित्रपट ‘चॅम्पियन्स’ पासून प्रेरित आहे, जो जेवियर फेसर दिग्दर्शित आहे आणि २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता.