(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलिवूड अभिनेता आमिर खान 2022 पासून बॉक्स ऑफिसवर जास्त दिसला नाही आहे. 2022 साली प्रदर्शित झालेला आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट थिएटरमध्ये फारशी कमाई करू शकला नाही. लाल सिंग चड्ढा हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिर खान चित्रपटातून जवळपास गायबच झाला. सध्या आमिर खान बॉक्स ऑफिसवर कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. सध्या आमिर खान कुली या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात आमिर खान रजनीकांतसोबत काम करताना दिसणार आहे. दरम्यान, आमिर खानबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ताज्या माहितीनुसार, आमिर खान चाहत्यांसाठी लवकरच ‘गजनी २’ चित्रपटाची घोषणा करणार आहे.
मिळालेल्या बातमीनुसार अभिनेता आमिर खान सध्या गजनी २ च्या कथेवर वेगाने काम करत आहे. गजनी 2 साठी आमिर खानने दिग्दर्शक लोकेश कनागराज आणि अल्लू अर्जुनाचे वडील अल्लू अरविंद यांच्याशी हातमिळवणी केली आहे, जो दक्षिण चित्रपटसृष्टीतील मोठा चित्रपट निर्माता म्हणून ओळखला जातो. दोघेही गजनी २ च्या कथेवर एकत्र काम करत आहेत. आमिर खान लवकरच गजनी २ या चित्रपटाबाबत मोठी घोषणा करू शकतो असे सांगितले जात आहे. गजनी 2 संदर्भात आमिर अल्लू अरविंदला अनेकवेळा भेटल्याचे सांगितले जात आहे.
हे देखील वाचा- Bigg Boss 18 : नव्या सीझनचा नवा कॅप्टन ठरला! बिग बॉस देणार या सदस्याला वरदान
या बातमीने मनोरंजन वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमिर खान सध्या एकाच वेळी अनेक प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करत आहे. आमिर खान 2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात व्यस्त आहे. याशिवाय आमिर खान राजकुमार संतोषी यांच्या ‘चार दिन की चांदनी’ या चित्रपटातही काम करत आहे. दुसरीकडे, आमिर आणि लोकेश ‘कुली’ आणि ‘कैथी 2’ साठी खूप उत्सुक आहे. या बातमीने आमिर खानच्या चाहत्यांचा उत्साह सातव्या गगनाला भिडला आहे.